Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली पाटबंधारे विभागाचे वतीने जागतिक जलदिनी 'जलजागृती' सप्ताहाचा समारोप

गडचिरोली पाटबंधारे विभागाचे वतीने जागतिक जलदिनी ‘जलजागृती’ सप्ताहाचा समारोप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जागतिक जल दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पाटबंधारे विभागाचे वतीने आज २२ मार्च २०२३ ला “जलजागृती सप्ताह समारोप कार्यक्रम” जलसंपदा विभाग सोनापुर कॉम्प्लेक्स परिसरात संपन्न झाला.सदर कार्यक्रम प्रसंगी जलदेवतेचे पूजन करून व जलदेवतेच्या प्रतिमेला माल्यार्पण  करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांनी जल प्रतिज्ञा घेऊन जलसाक्षरतेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्धार केला.मराठी नव वर्ष व जागतिक जल दिनाचे निमित्ताने समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी पाण्याचे महत्व विशद केले.३० नोव्हेंबर २०१६ चे शासन परिपत्रकाप्रमाणे कार्यक्रमाची प्रासंगीकता  प्रास्ताविकातून विशद करण्यात आली.जलजागृती सप्ताहाच्या दरम्यान सर्वांनी पाण्याची बचत आणि पाण्याचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचे आणि भविष्यातील पाण्याच संकट थांबविण्याचे आवाहन उपस्थितांना केले.प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले मार्गदर्शक जलप्रेमी मनोहर हेपट यांनी  समारोप प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना मागील ७ वर्षातील आपल्या कार्याकडे अंतर्मुख होऊन बघण्याचे आवाहन केले.एवढेच नव्हे तर  पुढील काळात आपण सर्वांनी संवेदनशील होऊन पाण्याचे महात्म्य जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना पटवून द्यावे; असेही आवाहन केले.प्रामुख्याने वातावरणातील बदल,प्रकृतीचे निसर्गाचे शोषण, समाजामध्ये वाढलेली हिंसा आणि पृथ्वीला आलेला ताप तसेच मानवाचा चंगळवाद यावर चिंतन मनन करण्याची आवश्यकता असून महात्मा गांधींच्या विचाराची व गाव स्वावलंबी होऊन तेथील जनसमुदायमध्ये जनजागृती ग्रामसभा,शाळा, महाविद्यालय यांचे माध्यमातून करण्याचा निर्धार व संकल्प,आजचे मराठी नववर्षाचे दिनी आणि जागतिक जलदिनाचे निमित्ताने उपस्थितांना आवाहन केले.’चला जाणूया नदीला आणि चला जाणूया वनाला’ या दोन्ही संकल्पनेला घेऊन आपण भविष्यात काम करूया; असा विश्वास त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केला .

सदर कार्यक्रमा प्रसंगी कुमारी तुमराम,गणेश कोरे, बोधलकर,विकास दुधबावरे,स्नेहल इंगुलवार, बाळकृष्ण पंधरे,कार्तिक ढवळे,रुपेश अलाम,किशोर कोडापे,रितेश झापे,भूषण नैताम,सुरेश राठोड,आत्राम, करण गौर,अंकित किरणापुरे,साई गेडाम,अथर्व परदेशी,कु.वीरा परदेशी व अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक भांडेकर यांनी तर आभार प्रदर्शन कुमारी तुमराम यांनी व्यक्त केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!