Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली पंचायत समितीची वार्षिक आमसभा ठरली वादग्रस्त- ज्यांच्यामुळे खुर्चीवर बसले त्यांचाच आयोजकांना...

गडचिरोली पंचायत समितीची वार्षिक आमसभा ठरली वादग्रस्त- ज्यांच्यामुळे खुर्चीवर बसले त्यांचाच आयोजकांना पडला विसर….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुनिश्वर बोरकर,गडचिरोली

गडचिरोली :- गडचिरोली पंचायत समितीची वार्षीक आमसभा काल २२ फेब्रुवारी रोजीआमदार डॉ.देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून सदर आमसभा विविध विषयांवर चांगलीच गाजून वादग्रस्त ठरली आहे.ज्यांच्यामुळे खुर्चीवर बसले त्यांचाच विसर आयोजकांना व आमदारांना पडल्याने आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे.

सभेला आमदार होळी,बिडिओ साळवे,माजी सभापती मारोतराव ईचोळकर,माजी उपसभापती विलास दशमुखे,माजी नगरसेवक प्रमोद पिपरे,इतर खाते प्रमुख कर्मचारी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते . आमदार होळी यांचे आगमन होताच पुलकलच्या महिलांनी पुलकलचे ग्रामसेवक फुलझेले यांना हटवा या मागणी साठी आमदारांना घेराव घातला. तेव्हा आमदार होळी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना फोन करून प्रकरण तात्पुर्ते शांत केले.सभेला लोकशाही,संविधान  विषयावर चर्चा सुरु करण्यात आली.त्यावेळेस सभेच्या ठिकाणी संत गाडगेबाबा,संत तुकडोजी महाराज या दोनच महापुरुषांचे फोटो लावण्यात आले  व संविधाना बाबत चर्चा सुरु केली.त्यावर सभेतील नागरिक मुकुंदराव उंदिरवाडे यांनी सभेतील माईक हिसकावून ठनसावून सांगीतले की,आपण संविधान, लोकशाहीच्या चर्चा करणारे अधिकारी या खुर्च्यांवर बसण्याचा अधिकार व आरक्षण ज्या महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला दिले; त्या संविधान कर्त्याचा फोटाच आमसभेत नाही.यावर सभेत काहीकाळ वादंग माजले होते.आयोजकाला लोकशाहीचा विसर पडला हि गंभीर बाब आहे. नाईलाजास्तव काहीकाळ आमसभा बंद करण्यात  आली.माजी उपसभापती विलास दशमुखे यांनी झालेली चुक निर्देशनास आणून देत,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा फोटो नंतर लावण्यात आला.प्रतिमेला पुष्पहार घालुन आमसभेला पुन्हा सुरवात करण्यात आली. 

सभेत ग्रामपंचायत पुलकल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक फुलझेले यांची बदली करा; असे पुलकल ग्रामवासीयांनी तक्रार केली असता, होळी यांनी ग्राम सेवकांस सात दिवसाचे आत पुलकल ग्रा.प.मधुन हाकला असा आदेश बिडिओला देताच पुलकलचे सरपंच व सदस्यांनी ‘तुम्ही कोण होता बदली करणारे ‘ अगोदर ग्रामसेवकाचा दोष दाखवा असे म्हटले.तेव्हा पुलकलचे नागरिक व ग्रामपंचायत,सदस्य हमरीतुमरीवर आले.पुन्हा आमसभेत गोंधळ निर्माण झाला होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आमसभेत न लावणार्‍या आयोजकावर कारवाई करण्याची मागणी मुकुंदराव उंदिरवाडे यांनी केली व सदर सभेत घडलेल्या घटनेचा निषेध केला. रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी सुध्दा सदर घटनेचा निषेध करून सदर घटनेची तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.यापूर्वीही मुकुंदराव उंदिरवाडे यांनी जिल्हा परिषद मुख्य गेट समोरील हटविण्यात आलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली याचेकडे तक्रार करून डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा पुन्हा त्याच ठिकाणी लावण्यास प्रशासनास भाग पाडले होते.उंदिरवाडे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले होते हे विशेष .

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!