Friday, August 28, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नगर परिषदेत वंचित बहुजन आघाडीने खोलला खाता; राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच उमेदवार...

गडचिरोली नगर परिषदेत वंचित बहुजन आघाडीने खोलला खाता; राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच उमेदवार विजयी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील गडचिरोली,देसाईगंज तसेच आरमोरी नगरपरिषदेत थेट नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विराजमान होणार,हे आज, रविवार २१ डिसेंबरला पार पडलेल्या मतदान निकालावरून स्पष्ट झाले आहे.देसाईगंज नगरपरिषदेत किमान नगराध्यक्ष तरी इतर पक्षाचा होणार,या आशेवर असलेल्या मतदारांच्या पदरी निराशा पडली.राजकारणात धनवर्षा जितकी महत्वाची असते,तितकीच रणनीतीही महत्वाची मानली जाते.असो,विजय आणि पराजय होतच असते.अश्यातच गडचिरोली नगरपरिषदेत वंचित बहुजन आघाडीने आपला खाता खोलून “मी बी बसणार ‘त्या’ बाकावर” म्हणून विजयी पताका रोवला आहे.त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ५ उमेदवार निवडून आलेत,तर गडचिरोलीच्या थेट नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रनोती सागर निंभोरकर या विराजमान होणार आहेत. त्यांनी ११ हजार ७६२ मते घेतली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अश्विनी रवींद्र नैताम यांनी ६ हजार ९२३ मते घेतली.निंभोरकर ह्या ४ हजार ८३९ मतांनी विजयी झाल्या आहेत.
गडचिरोली नगराध्यक्ष – प्रनोती सागर निंभोरकर  – भाजपा
  • नगरसेवक पदाचे विजयी उमेदवार👇
१.प्रभाग-१ अ – मनीषा खेवले – काँग्रेस
ब – पराग पोरेड्डीवार – काँग्रेस
२.प्रभाग-२ अ – हर्षल गेडाम – भाजपा
ब- कोमल नैताम- भाजपा
३.प्रभाग-३ अ – अनिल कुनघाटकर- भाजपा
ब – योगिता पिपरे – भाजपा
४. प्रभाग-४ अ – वर्षा शेडमाके- भाजपा
ब – श्रीकांत देशमुख – काँग्रेस
५.प्रभाग-५ अ – सिमा कन्नमवार- भाजपा
ब – सतीश विधाते – काँग्रेस
६. प्रभाग-६ अ – रमेश चौधरी – काँग्रेस
ब – ज्ञानेश्वरी धंदरे  – भाजपा
७. प्रभाग-७ अ – रवींद्र मेश्राम – राष्ट्रवादी काँग्रेस
ब – मेघा वरगंटीवार- काँग्रेस
८. प्रभाग-८अ – शिल्पा गव्हारे –भाजपा
ब – शेखर आखाडे- भाजपा
९. प्रभाग-९ अ- मुक्तेश्वर काटवे- भाजपा
ब – गुड्डी मारबते  – भाजपा
१०.प्रभाग-१० अ- केशव मडावी – भाजपा
ब – अर्चना निंबोड – भाजपा
११.प्रभाग-११ अ- प्रतिभा कुमरे – राष्ट्रवादी काँग्रेस 
ब – लीलाधर भरडकर – राष्ट्रवादी काँग्रेस
१२.प्रभाग-१२ अ- साक्षी बोलुवार – भाजपा
ब – निखिल चरडे – भाजपा
१३.प्रभाग-१३ अ- बाळकृष्ण टेंभुर्णे – वंचित बहुजन आघाडी
ब – माधुरी मंगरे – राष्ट्रवादी काँग्रेस 
क – अंजुम सय्यद – राष्ट्रवादी काँग्रेस 
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!