Sunday, September 27, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट- झोलाछाप डॉक्टरांचा धुमाकूळ; 'गल्लीत गोंधळ,दिल्लीत मुजरा'...

गडचिरोली जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट- झोलाछाप डॉक्टरांचा धुमाकूळ; ‘गल्लीत गोंधळ,दिल्लीत मुजरा’…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

सत्यवान रामटेके

गडचिरोली :- जिल्ह्यात ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र वा शिक्षण नसतांना सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याशी खेळून झोलाछाप बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट दिसून येत आहे.आरोग्य विभागातर्फे कारवाई शून्य केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर टांगला जातो आहे.

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक व गोरगरीब जनता पैस्याअभवी वा तज्ञ डॉक्टरची फी परवडत नसल्याने गावातील वा शहरी भागातील डॉक्टरांकडे उपचाराकरिता जात असतात.मात्र ज्या डॉक्टरकडे रुग्ण जातात; असा डॉक्टर खरोखरच वैद्यकीय प्रमाणपत्रधारक नोंदणीकृत आहे किंवा नाही; तसेच जी डिग्री घेतली आहे; त्यात तो प्रावीण्य आहे की इतर उपचार करून फसवणूक करीत आहे.याची कल्पना रुग्णांना नसते.रुग्णही अंगाला हळद लावून घेत नसल्याने शैक्षणिक पात्रता वा इतर बाबींकडे दुर्लक्ष करून बोगस डॉक्टरांद्वारे तपासणी करून घेत असल्याने चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.बोगस डॉक्टर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दवाखाने थाटून झोलाछाप करून रुग्णांना चुना लावण्याचे काम करीत आहेत.बोगस डॉक्टरांवर कुणाचाही वचपा नसल्याने बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करतांना दिसून येतात.

काही बोगस डॉक्टर दवाखाने न थाटता फिरते पथक चालवून रुग्णांवर उपचार करतांना दिसून येतात.एखादेवेळेस रुग्णांची प्रकृती खालावल्यास हात वर करून मोठ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला देत असतात.काही तालुक्यातील बोगस डॉक्टर मेडिकल  दुकानाच्या आड डॉक्टरकी करून रुग्णांवर उपचार करण्याचे काम सुरू केले असल्याने कायद्याचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.अशा झोलाछाप बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाने अंकुश लावावा; अन्यथा ‘गल्लीत गोंधळ,दिल्लीत मुजरा’ झाल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

मलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहीम; रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४१.६ टक्के घट.. -५६६ रुग्णांच्या बँक खात्यात २ लाख ८३ हजार रुपयांची बुडित मजुरी जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात हिवताप(मलेरिया)नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक,निदानात्मक व उपचारात्मक उपाययोजनांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.दुर्गम व डोंगराळ भागातील...

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!