Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाडा..

गडचिरोली जिल्ह्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाडा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त              
गडचिरोली :-कुटुंब कल्याण अंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसोबतच समाजातील बालविवाह रोखणे, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध करणे,कुटुंब नियोजनाच्या विविध साधनांचा वापर करणे आणि कुटुंबाचे मानसिक, आर्थिक,सामाजिक उन्नती करून कौटुंबिक आरोग्य अबाधित राखणे अपेक्षित आहे.पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाड्याच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबात पती-पत्नी मिळून,कुटुंब नियोजनावर बोलायला सुरुवात केली पाहिजे.पुरुषांनी स्वतःहून पुढाकार घेऊन स्वतःची नसबंदी करण्याचे व कुटुंब कल्याण कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा अत्यंत सोपी असून याकरिता दवाखान्यात भरती होण्याची आवश्यकता नसते. शस्त्रक्रियेनंतर अगदी अर्ध्या तासात पुरुष स्वतः चालू शकतो.शस्त्रक्रियेनंतर पुरुषामध्ये कुठलाही विपरीत परिणाम होत नाही.त्यामुळे जास्तीत-जास्त पुरुषांनी स्वतः शस्त्रक्रिया करून घेण्याचे आवाहन जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रफुल्ल हुलके यांनी केले.कुटुंब नियोजन हे केंद्र शासनाचे अत्यंत महत्त्वाचे धोरण आहे.मोठ्या प्रमाणात प्रगती झाली असून सुद्धा अद्यापही कुटुंब नियोजनाची जबाबदारी बऱ्याचदा स्त्रियांनाच पार पाडावी लागते.कुटुंब नियोजनात पुरुषांच्या सहभागाला चालना देण्यासाठी तसेच पुरुष नसबंदी पद्धती जसे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, निरोधचा वापर यांचे प्रमाण वाढविण्याच्या हेतूने पुरुष नसबंदी पंधरवाडा संपूर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात येत आहे.कुटुंब नियोजन कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच या कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग अधिक प्रयत्नशील व बळकट करण्यासाठी यावर्षी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा २०२४ राबविण्यात येत आहे. सदर पंधरवडा २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेची गुणवत्तापूर्ण व खात्रीशीर सेवा लाभार्थ्यांना सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पुरुष नसबंदी पंधरवडा साजरा केल्याने पुरुष शस्त्रक्रिये बाबत समाजात जनजागृती होऊन पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढविण्यास निश्चितच मदत होईल.अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिली.तसेच सदर पंधरवाडा यशस्वीपणे राबविण्याचे सूचना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.याकामी आवश्यक मनुष्यबळ व संसाधन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांनी केले आहे.
सदर पंधरवडा हा दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.पहिला टप्पा-२१ ते २७ नोव्हेंबर २०२४,
दुसरा टप्पा-२८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२४ असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!