Sunday, August 16, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वीच डेंग्यूने काढले डोके वर…

गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वीच डेंग्यूने काढले डोके वर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामपूर या गावात डेंग्यूचा उद्रेक झाला आहे.एकाच गावात १५ रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण ४ रुग्ण आणि चामोर्शी तालुक्यातील आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे एकूण ११ रुग्ण उपचार घेत आहेत.

पावसाळ्यापूर्वीच डेंग्यूने डोके वर काढल्याने आरोग्य विभागाच्या साथरोग नियंत्रण उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचे बोलले जात आहे. रामपूर येथे २२ मे रोजी डेंग्यूचे ३ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्येत वाढ झाली.२६ मे अखेरपर्यंत १५ रुग्ण निष्पन्न झाले आहेत.यातील ११ रुग्णांवर आष्टी ग्रामीण रुग्णालय,तर ४ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गावात अजूनही संशयित रुग्णांची शोध मोहीम आरोग्य विभागाकडून केली जात आहे.

यापूर्वीच दोन रुग्णांची प्लेटलेट्स कमी झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर सध्या ११ रुग्णावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आणखी ३ संशयित रुग्ण आष्टी येथे पाठवण्यात आल्याची माहिती आष्टीचे वैद्यकीय अधीक्षक ऋषिकेश बर्डे यांनी दिली आहे.

दरम्यान जिल्ह्यात पर्जन्यमान अधिक असते. त्यामुळे दरवर्षी डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांचा धोका अधिक बळावतो.जलजन्य आजारांचीही शक्यता असते, या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना राबविणे अपेक्षित आहे. मात्र, पावसाळा सुरू होण्याआधीच डेंग्यूने डोके वर काढल्याने या उपाययोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने(एपीआय) पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची...

गडचिरोलीतील रस्त्यांसाठी सुमारे २ हजार ६०० कोटींचा भरीव निधी; पायाभूत सुविधांच्या विकासाला गती.. – पोलीस जवानांचे योगदान अविस्मरणीय- ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासोबत जिल्ह्याचा समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपत स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर...

उद्याला राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे गृह(ग्रामीण),गृहनिर्माण, शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे उद्या,रविवार १६ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात...

ऐन स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात; तीन शालेय विद्यार्थिनींचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या हिंगणघाट शहरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.एकीकडे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा केला जात असतांनाच तीन शालेय विद्यार्थिनींचा भीषण अपघात मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!