- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरु असून १६ सप्टेंबर रोजी ईद-ए- मिलाद निमित्त मुस्लिम समाजतर्फे मिरवणूक कार्यक्रम तसेच १७ ते १९ सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मुर्तीचे विर्सजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात विविध धार्मिक सण,उत्सव शांततेत पार पाडावे; याकरीता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी १८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कलम ३६ चे पोटकलम ‘अ’ते ‘फ’ लागू केले आहे.
या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत,वाद्य वाजविणे बाबत,सभेचे आयोजन व मिरवणुक काढण्याबबात,मिरवणूकीचे मार्ग निश्चित करण्याबाबत,लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.यात अ) मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, आ) मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, इ) मिरवणुकीस बाधा होणार नाही; याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाच्या जवळ लोकांचे वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, ई) सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे,गाणी गाणे,ढोलताशे वाजविणे इत्यादिचे निर्बंध घालण्याचे अधिकार, उ) रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार,ऊ) सार्वजनिक ठिकाणी,रस्त्यावर लाउडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार ऋ) कलम ३३, ३५,३७, ते ४०,४२,४३, व ४५ मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकारांचा समावेश आहे.
सदर आदेश लागू असताना सभा,मिरवणुकीत वाद्य वाजविणे,लाऊडस्पिकर वाजविणे,मिरवणुकीत नारे लावणे,मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घेण्यात यावी.सर्व बाबतीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे; असे जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्या आदेशात नमूद आहे.
- Advertisement -

