Tuesday, August 18, 2026
Homeगडचिरोलीकोपर्शी जंगल परिसरातील पोलीस-नक्षल चकमकीची दंडाधिकारीय चौकशी..

कोपर्शी जंगल परिसरातील पोलीस-नक्षल चकमकीची दंडाधिकारीय चौकशी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एखादेवेळी पोलीस-नक्षल चकमकीत  निष्पाप लोकं जिव गमावून बसतात.त्यामुळे अश्या परिस्थितीत चकमक सुरू असतांना घटनेतील मृत्युच्या कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता,२०२३ चे कलम १९६ अन्वये दंडाधिकारी चौकशी करण्यात येते.त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कोठी,उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या कोपर्शी जंगल परिसरात २१ ऑक्टोंबर २०२४ रोजी पोलीस-नक्षल चकमक झाली होती. चकमकी दरम्यान,दोन पुरुष व तीन महिलांचे मृतदेह आढळले होते.त्यामुळे या घटनेतील मृत्युच्या कारणांचा शोध लावण्याकरिता दंडाधिकारी चौकशी करण्यात येणार आहे.त्यामुळे सदर घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छीणाऱ्यांनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभगीय दंडाधिकारी,एटापल्ली यांच्याकडे १५ दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी सादर करावे; असे आवाहन उपविभागीय अधिकारी नमन गोयल यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!