Wednesday, August 26, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथील पाच विध्यार्ध्यांनी दहावीच्या परीक्षेत घेतली उंच भरारी.....- विद्या निकेतन लोकमान्य...

कोंढाळा येथील पाच विध्यार्ध्यांनी दहावीच्या परीक्षेत घेतली उंच भरारी…..- विद्या निकेतन लोकमान्य टिळक शाळेचा ९२.४५ टक्के निकाल जाहिर…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

कोंढाळा(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील विद्या निकेतन लोकमान्य टिळक शैक्षणीक संकुल शाळेच्या दहावीचा निकाल ९२.४५ टक्के लागला असून गावातील पाच विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उंच भरारी घेतली असल्याने सदर विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव केला जातो आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे.त्यानुसार कोंढाळा येथील दहावीच्या परीक्षेत नंदिनी कैलास राऊत ७८.६ %, आरती विलास वांढरे ७६.६%, प्रज्वल भक्तीकिशोर बोरुले ७६.२%, निशांत किशोर दुपारे ७५% व साक्षी राजू नागमोती ७४.४% या विद्यार्थ्यांनी विद्या निकेतन लोकमान्य टिळक शैक्षणीक संकुल शाळेतून टॉप पाच मध्ये प्रावीण्य मिळविले आहे.प्रावीण्य मिळविलेल्या व उत्कृष्टरित्या पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक के.एम.देशमुख, एस.एस.हर्षे,आर.वाय. कन्नाके,एम.आर.इंगोले, ए.व्ही.निंबुरकर व बी.एस.पारधी यांनी केले आहे.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!