Friday, July 3, 2026
Homeगडचिरोलीकुरखेडा,सिरोंचा,धानोरा आणि मुलचेरा तालुक्यांत मुलींचे प्रमाण कमी.. - बेकायदेशीर गर्भलिंग चाचण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचे...

कुरखेडा,सिरोंचा,धानोरा आणि मुलचेरा तालुक्यांत मुलींचे प्रमाण कमी.. – बेकायदेशीर गर्भलिंग चाचण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचे कडक कारवाईचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील घटत्या लिंग गुणोत्तराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी ज्या तालुक्यांमध्ये मुलींचे प्रमाण चिंताजनक आहे,तिथे गर्भलिंग निदान(‘पीसीपीएनडीटी’)कायद्यांतर्गत तपासणी मोहीम तीव्र करण्याचे सूचना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या ‘पीसीपीएनडीटी’ (PCPNDT)टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे तसेच टास्क फोर्स समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्ह्यातील एकूण लिंग गुणोत्तर समाधानकारक असले,तरी काही विशिष्ट भागांमध्ये विशेषतः सिरोंचा, धानोरा,मुलचेरा आणि कुरखेडा या तालुक्यांमध्ये मुलींचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे. यावर चिंता व्यक्त करत जिल्हाधिकारी पंडा यांनी स्त्रीभ्रूणहत्येला प्रतिबंध करण्यासाठी या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले.
बैठकीत गेल्या वर्षभरात बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करणाऱ्या केंद्रांवर एकही ‘डीकॉय'(बनावट ग्राहक पाठवून केलेली कारवाई)झाली नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.अंमलबजावणीची प्रक्रिया अधिक मजबूत करण्याची गरज असून, प्रत्येक तालुक्यात किमान एक ‘डीकॉय’ कारवाई करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.यासाठी पोलीस विभागाची मदत घेण्याचे आणि आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविकांच्या संमतीने अशा मोहिमा आखण्याचे निर्देश दिले गेले आहेत.तसेच माहिती देणाऱ्यास जाहीर करण्यात आलेले १ लाख रुपयांचे बक्षीस आणि त्याबाबतच्या जनजागृतीवर भर देण्यास सांगण्यात आले आहे.या बैठकीला आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पीसीपीएनडीटी समितीचे सदस्य आणि संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा कहर; घराचा स्लॅब कोसळून आजी आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार सुरू झाली आहे.अश्यातच काही ठिकाणी पावसामुळे जीवितहानीच्या दुर्घटनाही घडू लागल्याचे उघडकीस येऊ लागले आहे.अश्याच प्रकारे...

आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात अनुज्ञेय असलेल्या ११४ ग्रामपंचायत स्तरावरील तसेच २ नगर परिषद/नगर पंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज...

गडचिरोली शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी शासकीय जमीन मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली नगर परिषदेमार्फत अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट(एसटीपी)प्रकल्पासाठी मौजा गडचिरोली येथील सर्व्हे क्रमांक-८४ मधील २.०४ हेक्टर शासकीय जमीन भोगवट्याने...

सतर्कतेचा इशारा.. आज गोसीखुर्द धरणामधून वैनगंगा नदीपात्रात सोडणार पाणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पावसाळ्याचा अख्खा जून महिना लोटून गेला,तरीही पावसाने पाठ फिरवली होती. मात्र,जुलै महिना लागणार,तोच पावसाने राज्याच्या विविध भागात कोसळधारा सुरू केल्या.यामुळे काही ठिकाणी विशेषतः...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!