Thursday, April 16, 2026
Homeनागपूरकंपनीच्या भीषण स्फोट प्रकरणातील फरार आरोपींचा तीन राज्यात शोध सुरू.. - सहा...

कंपनीच्या भीषण स्फोट प्रकरणातील फरार आरोपींचा तीन राज्यात शोध सुरू.. – सहा आरोपींच्या अटकपूर्व जामीनास न्यायालयाचा नकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील स्फोटके बनवणाऱ्या एसबीएल कंपनीतील भीषण स्फोट प्रकरणात सहा आरोपींनी अटकेपासून बचावासाठी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. एसबीएल कंपनीत १ मार्च २०२६ रोजी भीषण स्फोट झाला होता.या घटनेची माहिती मिळताच कंपनीचे संचालक रायपूर(छत्तीसगड)येथील आलोक चौधरी आणि संजय चौधरी यांच्यासह एकूण ११ आरोपी त्यांच्या घरून व इतर ठिकाणांहून फरार झाले होते. प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून फरार आरोपींचा शोध महाराष्ट्रासह तीन राज्यांत सुरू आहे.घटनेला ९ दिवस उलटूनही फरार आरोपींबाबत पोलिसांना अद्याप ठोस धागेदोरे मिळाले नाहीत.दरम्यान,कंपनीत झालेल्या स्फोटात मृतांची संख्या सातत्याने वाढत असून ती आता २५ वर पोहोचली आहे.दरम्यान,फरार ११ आरोपींपैकी आलोक अवधिया,अरविंद पाचपुत्रे, श्रवण कुमार,रवींद्र पोखर्णा,मनोजकुमार प्रसाद आणि सत्यवती पाराशर यांनी अटकेपासून बचावासाठी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.सोमवारी बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला.आरोपींच्यावतीने ॲड.प्रकाश जायसवाल,ॲड.प्रफुल्ल मोहगावकर यांच्यासह अन्य वकिलांनी बाजू मांडली.पोलिसांनी या प्रकरणात लेखी उत्तर सादर करून आरोपींच्या जामीन अर्जाला कडाडून विरोध केला.जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे आणि ॲड.मैथिली काळवीट यांनी न्यायालयाला सांगितले की,पाराशर या कंपनीच्या संचालकांपैकी एक असून त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचे योग्य पालन केले नाही.त्यामुळेच हा स्फोट होऊन कामगारांचा मृत्यू झाला.तसेच इतर आरोपींच्या निष्काळजीपणाही या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचे त्यांनी नमूद केले.दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर.पुरवार यांनी सर्व आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!