Monday, August 10, 2026
Homeजळगांवओटीपी सांगताच तरुणास ७ लाख ६० हजारास लावला चुना....!

ओटीपी सांगताच तरुणास ७ लाख ६० हजारास लावला चुना….!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

जळगांव :-  अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील मूळ रहिवासी मिलिंद प्रकाश पाटील (वय २३) हा तरुण सद्यस्थितीत पुण्यातील हिंजवडी येथे वास्तव्यास आहे. मिलिंद यास त्याच्या मोबाईलवर १८ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोनवर बोलणाऱ्या संबंधित व्यक्तीने मिलिंद यास पर्सनल लोन तसेच क्रेडीट कार्डच्या वेगवेगळया ऑफरबद्दल माहिती देत मिलिंद याचा विश्वास संपादन केला.

यादरम्यानच त्याला ओटीपी पाठवून तो विचारला.मिलिंद याने ओटीपी सांगितल्यावर ओटीपीच्या आधारावर संबंधितांनी मिलिंद याच्या बँक खात्यातील तब्बल ७ लाख ६० हजार एवढी रक्कम दुसऱ्या बँक खात्यावर ट्रान्स्फर करुन घेतली.आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर मिलिंद पाटील याने शुक्रवारी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!