- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एनडीए म्हणजेच भाजपला पाठिंबा दर्शविणारे पक्ष यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यापूर्वीच उमेदवार जाहीर केला आहे.यासाठी त्यांनी राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.चंद्रपुरम पोन्नूस्वामी राधाकृष्णन असे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नाव असून ते मुळचे तामिळनाडूचे आहेत.राधाकृष्णन यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.त्यांनी ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला आहे.यापूर्वी त्यांनी १८ फेब्रुवारी २०२३ ते ३० जुलै २०२४ पर्यंत झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते.मार्च ते जुलै २०२४ पर्यंत तेलंगणाचे राज्यपाल आणि मार्च ते ऑगस्ट २०२४ पर्यंत पाँडिचेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे.
काँग्रेसला पाठिंबा दर्शविणारे पक्ष म्हणजेच इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नव्हता.अश्यातच आता आज,मंगळवार १९ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीनेही उमेदवार जाहीर केला आहे.इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे.बी सुदर्शन रेड्डी हे मुळचे आंध्र प्रदेशातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील आहेत.त्यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला होता.शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि गोव्याचे पहिले लोकायुक्त राहिले आहेत.१९७१ मध्ये हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे.सुदर्शन रेड्डी यांची १२ जानेवारी २००७ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि ते ८ जुलै २०११ रोजी निवृत्त झाले.निवृत्तीनंतर,त्यांनी मार्च २०१३ मध्ये गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता आणि त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे ऑक्टोंबर २०१३ मध्ये राजीनामा दिला होता.
- Advertisement -

