Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे.सरकार आणि बँक युनियन यांच्यात चर्चा होऊनही प्रमुख मागण्यांवर कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्याने संघटना संप करण्यावर ठाम आहे.यामुळे बँक शाखांमधील रोजच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ शकतो.मात्र,डिजिटल बँकिंग,यूपीआय आणि एटीएम यांसारख्या काही सेवा सुरू राहण्याची शक्यता आहे.उद्या होणाऱ्या संपाची सुरुवात ही मोठ्या आंदोलनाची तयारी असल्याचे संघटनेने म्हटले आहे. मागण्यांवर तोडगा निघाला नाही,तर यूनियनने २८ ते ३० सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांचा देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. यानंतर २६ ऑक्टोंबरपासून अनिश्चितकालीन संपाचा इशारा देण्यात आला आहे.संप करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे,बँकांसाठी आठवड्यातून पाच दिवस बँकिंग सुरू ठेवणे म्हणजे बँकांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा. तसेच यूनियन पब्लिक सेक्टरच्या बँकांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी परफॉर्मेंस लिंक्ड इंसेंटिव्ह म्हणजेच ‘पीएलआय’ व्यवस्थेविषयीही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पीएलआय योजनेबाबतचे मतभेद दूर करणे व पेन्शनशी संबंधित प्रलंबित मागण्या पूर्ण करणे,आदी मागण्यांसंदर्भात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने देशव्यापी संप पुकारला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!