Saturday, August 8, 2026
Homeमुंबईउद्याला डॉक्टरांचा देशव्यापी संप; दवाखाने राहणार बंद... -तब्बल २४ तास सेवा...

उद्याला डॉक्टरांचा देशव्यापी संप; दवाखाने राहणार बंद… -तब्बल २४ तास सेवा राहणार बंद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-कोलकात्यात आरजी कर मेडिकल कॉलेजात
महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे.या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) उद्या १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.तसेच आयएमएने रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे.तसेच आजपासून देशभरातील डॉक्टरांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहे.आयएमएने एक पत्रक काढून १७ ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे सर्व दवाखाने,क्लिनिक्स,ओपीडीच्या सेवा १७ ऑगस्ट सकाळी ६ ते १८ ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.मात्र,अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.तब्बल २४ तास सेवा बंद राहणार आहे.या दरम्यान अत्यावश्यत सेवा सुरू राहणार आहे. आयसीयू,अपघात विभाग आणि प्रसूतीसेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे.अतिदक्षता कक्ष,आयसीसीयू, अत्यावश्यक शस्रक्रिया सुरु राहणार आहेत.उद्या शनिवारी सकाळी ६ ते रविवारी सकाळी ६ या २४ तासांत फक्त खासगी रूग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन सेवाच सुरू राहणार असल्याची माहिती आयएमएने दिली आहे.इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीने या संपामध्ये उतरणार आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा आणला पाहिजे.
जवळपास २५ राज्यांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी
कायदे असले,तरी ते त्याची अंमबजावणी होताना
दिसत नाही.हॉस्पिटलमध्ये ५० टक्के महिला डॉक्टर
असतील तर महिलांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.
कोलकात्यात आरजी कर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.हायकोर्टाने हा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले होते.सध्या कोलकाता शहरात तणावाची स्थिती आहे.
बलात्कारानंतर हत्या करण्यात आलेल्या महिला डॉक्टरचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा केला जातोय. मृत डॉक्टरशी अनेकवेळा बळजबरीने शरीससंबंध ठेवण्यात आल्याचा दावा केला जातोय. पहाटे ३ ते ५ वाजेदरम्यान महिलेसोबत हा प्रकार घडला आहे.बलात्कार पीडित महिला डॉक्टरच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आहेत.या महिलेच्या ओठांवर, नाकावर, गाल,जबडा तसेच शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत.या डॉक्टरच्या डोक्यालाही मार आहे.इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार पीडित डॉक्टरचे तोंड बंद करण्यात आले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!