Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीउद्याला गडचिरोलीत रोजगार मेळाव्याचे आयोजन..

उद्याला गडचिरोलीत रोजगार मेळाव्याचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली,दे-आसरा फाऊंडेशन आणि इनक्यूबेशन कम बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठ,कोटगल रोड गडचिरोली येथे उद्या,बुधवार २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार/उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर रोजगार/उद्योजक मेळाव्यामध्ये डॉ.रविंद्र अहेर (बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटजिस्ट),अमर नायसे(ब्रेन ऑप्टीमायझेसन कोच)व अनिरूदध आठवले(मेंटर इनफेड-IIM नागपूर)उपस्थित राहून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.त्यासह विविध नामांकित कंपन्या सुध्दा सहभागी होणार आहेत.सदर रोजगार/उद्योजक मेळाव्याकरिता ईच्छूक असलेल्या उमेदवारांनी/उद्योजकांनी उद्या बुधवारी गोंडवाना विद्यापीठ,कोटगल रोड गडचिरोली येथे सकाळी अकरा वाजता उपस्थित राहून रोजगार/उद्योजक मेळाव्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!