- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-उद्यापासून ‘जीएसटी’ म्हणजेच वस्तू आणि सेवा कराचे नवे दर लागू होत असून घरगुती सामानापासून ते वाहनांपर्यंत अनेक वस्तू स्वस्त होणार असल्याने सरकारने जीएसटी कपात करुन एकप्रकारे सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.विशेष म्हणजे, उद्या,सोमवार २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रास प्रारंभ होत आहे.जीएसटीच्या नव्या दरानुसार,दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत,जसे की, शॅम्पू,साबण,लहान मुलांची उत्पादने,आरोग्य विमा,वाहने व इतर.सरकार देशभरात या दरांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी तत्पर असून त्यासाठी खास पोर्टल आणि हेल्पलाइन सुरू केल्या आहेत.वस्तूंच्या कमी झालेल्या किंमती,बिलांमध्ये मिळालेली सूट किंवा कोणत्याही अनियमिततेबद्दल ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.नव्या प्रणालीनुसार, ‘राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन’ https://consumerhelpline.gov.in https://consumerhelpline.gov.in च्या ‘इनग्राम'(InGram- Integrated Grievance Redressal Mechanism)पोर्टलवर जीएसटी संबंधित तक्रारींसाठी एक वेगळी श्रेणी तयार करण्यात आली आहे.यात ऑटोमोबाईल,बँकिंग,एफएमसीजी आणि ई-कॉमर्ससारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.तुम्ही टोल-फ्री क्रमांक-१९१५, एनसीएच ॲप,वेब पोर्टल,व्हॉट्सॲप,एसएमएस, ईमेल किंवा उमंग ॲपद्वारेही आपली तक्रार नोंदवू शकता.ही सेवा हिंदी, इंग्रजी,तमिळ,बंगाली,गुजराती आणि आसामीसह १७ स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध आहे.याशिवाय,सरकारने http://savingwithgst.in नावाचे एक दुसरे पोर्टलही सुरू केले आहे.या पोर्टलवर तुम्ही जीएसटी लागू होण्यापूर्वीच्या आणि नंतरच्या किमतींची तुलना करू शकता.यामुळे तुम्हाला कोणत्या वस्तूंवर तुमची किती बचत होत आहे,याचा अंदाज येईल.यात अन्नपदार्थ, घरगुती वस्तू,इलेक्ट्रॉनिक्स अशा अनेक श्रेणी उपलब्ध आहेत.या नव्या तक्रार प्रणालीमुळे ग्राहकांना जीएसटी दर कपातीचा फायदा मिळत आहे की नाही,हे तपासण्यास मदत मदत होणार आहे.
- Advertisement -

