Friday, June 5, 2026
Homeगडचिरोलीउत्स्फुर्तपणे सर्वांनी मतदान करा-जिल्हाधिकारी संजय दैने -उन्हापासून बचावासाठी सकाळच्या सत्रातच मतदान करावे

उत्स्फुर्तपणे सर्वांनी मतदान करा-जिल्हाधिकारी संजय दैने -उन्हापासून बचावासाठी सकाळच्या सत्रातच मतदान करावे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात उद्या दिनांक- १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे.या मतदान प्रक्रियेत सर्व मतदारांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा आणि भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार कर्तव्य म्हणून बजावा; असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात मतदान होत असून जिल्हा प्रशासन निवडणूक घेण्यासाठी सज्ज झाले आहे.मतदानापासून को‍णीही वंचित राहू नये,म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करावे. 

मतदानाची वेळ

आरमोरी,गडचिरोली,अहेरी व आमगाव या विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ ही सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत आणि ब्रम्हपुरी व चिमुर या विधानसभा मतदार संघात मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. 

उन्हापासून बचावासाठी सकाळच्या सत्रातच मतदान करावे

उन्हापासून बचावासाठी मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध असली तरी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत सकाळच्या सत्रातच मतदान करावे,असा संदेश जिल्हाधिकारी दैने यांनी दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नवीन रेल्वे लाईन कामाच्या दृष्टीने दोन दिवस मेमू पॅसेंजर गाड्या राहणार रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात वडसा-गडचिरोली नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत.यामुळे येत्या,रविवार ७ जून...

यंदाच्या हंगामात अल-निनोचा प्रभाव असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे आटोपल्याने शेतकरी दरवर्षी पेरणीची घाई करतात.पण,यंदाच्या हंगामात अल-निनोचा प्रभाव दिसून येत असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता...

जागतिक पर्यावरण दिन विशेष.. राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीची शाश्वत विकासाकडे वाटचाल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातील सर्वाधिक वनाच्छादित जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीने पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभाग यांचा अद्वितीय संगम साधला आहे.राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!