- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील निवडणूका २० नोव्हेंबर रोजी पार पाडणार आहेत. त्यानुषंगाने, आरमोरी विधानसभा क्षेत्रातील एकुण ३१० बुथवर निवडणुक प्रकिया पार पडणार आहे.त्याकरीता आज,सोमवार १८ नोव्हेंबर रोजी ३९ बुध निहाय पथक हेलीकॅप्टरव्दारे व ९१ पथक बस आणि इतर वाहनाने आपले शासकिय कर्तव्य पार पाडण्याकरीता रवाना झालेली आहेत.मतदान कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याकरीता व त्यांना प्रोत्साहन देण्याकरीता निवडणूक निरीक्षक विनीतकुमार व निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी देसाईगंजच्या मानसी,सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी कुरखेडा हे देसाईगंजच्या तालुका क्रिडांगण येथील हेलीपॅडवर उपस्थित होते.

यावेळी क्षेत्रिय अधिकारी व मतदान अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.विधानसभा निवडणूक अनुषंगाने मतदान अधिकारी यांनी उत्साह पूर्वक पूर्वीच्या निवडणुकीचे अनुभव व्यक्त केले. प्रत्येक नागरिकांनी सहभाग दर्शवून संपुर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडण्याकरीता सहकार्य करावे; असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मानसी यांनी केले आहे.
- Advertisement -

