Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीआपण जी फळे खातो ती आरोग्यास लाभदायक की हानिकारक....!- फळांच्या देठामध्ये टाकले...

आपण जी फळे खातो ती आरोग्यास लाभदायक की हानिकारक….!- फळांच्या देठामध्ये टाकले जाते रसायनयुक्त इंजेक्शन- नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- बाजारपेठांमध्ये हल्ली उष्णतेपासून बचाव करण्याकरिता टवटवीत व आकाराने मोठी दिसणारी फळे खरोखरच आरोग्यास लाभदायक की हानिकारक असा प्रश्न पडला आहे.टवटवीत,आकाराने मोठी व रंग गडद असणाऱ्या फळांच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उन्हाळ्यात मानवी शरीरासाठी टरबूज व खरबूज पोषक असतात.टरबूज व खरबूज लहानांपासून तर वृद्धापर्यंत मोठ्या आवडीने खातात.उन्हाळ्याच्या दिवसात ही फळे उष्णतेपासून बचाव करण्याकरिता फार मदत करतात.फळे आरोग्यास हितकारक असली तरी फळांचा आकार वाढविण्यासाठी तसेच रंग गडत दिसण्याकरिता ‘ऑक्टोसीन’ नावाच्या घातक रसायनाचे इंजेक्शन फळांना दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.आरोग्यवर्धक म्हणून प्रत्येक फळांना महत्त्व आहे. यामध्ये टरबूज,खरबूज, काकडी,सफरचंद,पपई, फणस,आंबा,डाळींब,केळी सारख्या आरोग्यवर्धक फळांना जास्तीत जास्त मोठा आकार येण्यासाठी काही खासगी सिड कंपन्या शेतकऱ्यांना बीजे पुरवून या फळांच्या देठामध्ये घातक रसायन असलेले 3 ते 4 मिली सोडण्यासाठी सांगतात.फळांच्या देठामध्ये रसायन टाकल्याने फळांचा आकार लवकरात लवकर मोठा होऊन अशांची विक्री बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

फळांचा रंग गडद व आकार मोठा दिसत असल्याने भुरळ घातली जात आहे.मात्र अशी ही फळे खरोखरच पोषक व आरोग्यवर्धक असतात कां? असा प्रश्न निर्माण झाला आहे.फळांच्या देठामध्ये प्रामुख्याने ‘ऑक्टोसीन’ नावाचे घटक असलेल्या इंजेक्शनचा वापर करण्यात येतो.शासनाने अशा प्रकारच्या रसायनावर बंदी घातलेली असल्याने असे इंजेक्शन आंध्रप्रदेश,कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात येत असून परिसरात त्याची विक्री सर्रास होताना दिसत आहे.इंजेक्शनचा उपयोग प्रामुख्याने वामरू मरण पावलेल्या दुधाळ जनावरांचे दूध काढतेवेळी करण्यात येतो.रसायनाचा वापर त्वरित बंद करून यावर आळा घातला पाहिजे.अन्यथा पैश्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणे सुरूच राहणार  आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!