Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीआदिवासी बांधवाला अश्लील व जातीवाचक शिवीगाळ; राज बन्सोड सह चार जणांवर गुन्हे...

आदिवासी बांधवाला अश्लील व जातीवाचक शिवीगाळ; राज बन्सोड सह चार जणांवर गुन्हे दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुनिश्र्वर बोरकर
गडचिरोली :-जिल्हा खनिकर्म कार्यालय परिसरात काही कामानिमित्त गेलेल्या एका आदिवासी बांधवाला बेकायदेशीरपणे नजरकैदेत ठेवून अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी परिवर्तन पॅनलचे मुख्य संयोजक तथा आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांचे सह चार जणांवर तसेच सात ते आठ जणांवर लायजनिंग ऑफीसर धनेश मोतीराम जुमनाके वय ५० वर्षे,रा.लाझेंडा वॉर्ड क्र.०५,धानोरा रोड, गडचिरोली यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून गडचिरोली पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोशन कोटरंगे,वय २८ वर्षे, रा.कोनसरी,ता.चामोर्शी,जि.गडचिरोली,सुनंदा जेंगठे,वय ४९ वर्षे,रा.कोनसरी,ता.चामोर्शी,जि.गडचिरोली,विवेक खोब्रागडे ऊर्फ विक्की, वय ३५ वर्षे,रा.गडचिरोली,राज बन्सोड,वय ४० वर्षे, रा.गडचिरोली तसेच त्यांचेसोबत इतर सात ते आठ अनोळखी इसम अशी आरोपींची नावे असून त्यांचेवर  अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती अत्याचार याचार प्रतिबंधक अधिनियम,१९८९ अंतर्गत कलम ३(२)(व्ही ए),३(१)(आर),३(१)(व्ही), भारतीय न्याय संहिता(बी एन एस),२०२३ अंतर्गत कलम २९६, १९०,१८९(२),१२७(२),११५(२)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की,धनेश जुमनाके हे मे.त्रिवेणी अर्थमुव्हर्स अँड इंफ्रास्टक्चर प्रा.लि.मध्ये सन २०२१ पासुन ज्यु.लायजंनिग ऑफीसर या पदावर कार्यरत असून १७ डिसेंबर २०२५ रोजी ते दुपारी दीड वाजेच्या सुमारास जिल्हा खनिकर्म कार्यालय गडचिरोली  परिसर येथे रॉयल्टी चालान भरण्याच्या अधिकृत कामासाठी उपस्थित होते.त्यावेळी तेथे उपस्थित असलेले रोशन कोटरंगे,सुनंदा जेंगठे,विवेक खोब्रागडे, राज बन्सोड व त्यांचेसोबत इतर ७-८ अनोळखी इसम यांनी अचानकपणे धनेश यांना घेरून “तु जुमनाके आहेस का?” होकार देताच हात पकडुन,जबरदस्तीने अडवुन ठेवले,हालचाल रोखली व बेकायदेशीरपणे नजरकैदेत ठेवले.विरोध केला असता शरीर दाबुन ठेवले व अश्लील अपमानास्पद शीवीगाळ करुन सार्वजनिक ठिकाणी अपमान केला.त्याचबरोबर, “तुला भर चौकात नग्न करुन मारहाण करु,पत्नी बद्दल अपशब्द वापरले.घराला घेराव/मोर्चा घालुन कुटुंबाला इजा करु,कोनसरी येथील जमीन संपादनाविरोधात व्हिडीओ जबाब दे अन्यथा गंभीर परिणाम होतील” तसेच उपस्थितांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप धनेश जुमनाके यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे.तसेच सार्वजनिक ठिकाणी जबरदस्तीने व्हिडीओ काढला व कागदी जबाब जबरदस्तीने द्यायला भाग पाडले,तो व्हिडीओ त्यांनी सोशीयल मिडीयावर प्रसारीत केला आहे,त्यामुळे माझ्या प्रतिष्ठेला व सुरक्षीततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.यामुळे मला तिव्र मानसीक त्रास झाला असुन आता माझी जगण्याची इच्छा राहीलेली नाही,मला आत्महत्या करण्याचा विचार येत आहे.माझे कुटुंब सुध्दा भीतीच्या वातावरणात राहत असुन घराबाहेर पडण्याची हिमंत करीत नाही,भविष्यात मला किंवा माझ्या कुटुंबास काहीही व कुठलीही जिवीत हानी अथवा नुकसान झाल्यास रोशन कोटरंगे,सुनंदा जेंगठे,विवेक खोब्रागडे ऊर्फ विक्की,राज बन्सोड तसेच त्यांचेसोबत असलेले इतर ७ ते ८ अनोळखी इसम हे सर्व जबाबदार राहतील. असेही धनेश जुमनाके यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तोंडी तक्रारीत नमूद केले आहे.राज बन्सोड व इतर आरोपी फरार असुन गडचिरोली पोलीसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.सदर घटनेचा आदिवासी बांधवानी निषेध केला असुन आदिवासी बांधवांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन दिले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!