- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या दोन हजाराच्या आर्थिक लाभानंतर महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये थेट शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहेत.नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता हा पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.या हप्त्यासाठी १ हजार ७७४ कोटी निधी वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली असून राज्यातील सुमारे ९० लाख ३४ हजार पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेतीचा वाढता खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा मुख्य उद्देश आहे.केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २२ वा हप्ता शुक्रवार,१३ मार्च २०२६ रोजी वितरित करण्यात आला होता.अश्यातच आता महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना पुढील आठवड्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये खात्यात जमा होणार असल्याने हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- Advertisement -

