उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी तेल विपणन कंपन्यांनी विक्रेत्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्याचे ठरवले आहे.इंडियन ऑइल,भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल विपणन कंपन्या व्यावसायिक वापरासाठी दहा किलो वजनाचे हलके एलपीजी गॅस सिलेंडर बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत.या निर्णयामुळे छोट्या व्यवसायांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. सदरचे नवीन सिलेंडर हाय-डेन्सिटी पॉलिथिलीन पासून तयार करण्यात येणार आहेत.हे कंपोझिट सिलिंडर पारंपरिक स्टील सिलेंडरपेक्षा खूपच हलके असल्याने त्यांची वाहतूक आणि वापर अधिक सोपा होईल.गॅस एजन्सी तसेच निवडक विक्री केंद्रांमधून हे सिलेंडर व्यावसायिक एलपीजी दरात उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या नव्या उपक्रमाचा सर्वाधिक लाभ लहान व्यावसायिकांना होणार आहे.स्थलांतरित कामगार, भाडेकरू,विद्यार्थी,फूड स्टॉल चालक,कॅफे,छोटे रेस्टॉरंट आणि रस्त्यावरील विक्रेते यांना मोठे १९ किलोचे सिलेंडर साठवण्यासाठी जागेची अडचण भेडसावत असते; अशा ग्राहकांसाठी दहा किलो वजनाचा हलका गॅस सिलेंडर अधिक सोयीचा पर्याय ठरणार आहे.
आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

