Sunday, May 31, 2026
Homeगडचिरोलीआता दिव्यांग बांधवांसाठी रोजगाराचे नवे दालन..

आता दिव्यांग बांधवांसाठी रोजगाराचे नवे दालन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात दिव्यांग युवक-युवतींच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि यूथ फॉर जॉब्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU)करण्यात आला असून,या करारावर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व यूथ फॉर जॉब्स तर्फे राज्य समन्वयक महेंद्र पाटील यांनी स्वाक्षरी केली असून या कराराअंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग तरुण-तरुणींना १०० टक्के यूडीआयडी (UDID) कार्ड,विविध क्षेत्रातील मोफत प्रशिक्षण,कौशल्य विकास कार्यक्रम,रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळणार आहेत.तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभही दिव्यांगांना मिळणार आहे.यामुळे दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मदत होणार आहे.
यूथ फॉर जॉब्स फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात दिव्यांग व्यक्तींशी संबंधित विविध उपक्रम राबवत आहे.गडचिरोलीमध्येही फाउंडेशनचे विशेष प्रशिक्षण केंद्र कार्यरत असून,जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला अधिक बळ मिळणार आहे.या कराराबाबत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की, “दिव्यांग युवकांना सक्षम करण्यासाठी हा करार एक मैलाचा दगड ठरेल.” तसेच यूथ फॉर जॉब्स फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आणि अधिकाधिक दिव्यांग युवकांपर्यंत पोहोचण्याचा मनोदय व्यक्त केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!