Saturday, September 19, 2026
Homeगडचिरोलीआता गडचिरोली जिल्ह्यात मांगूर माशाचे मत्स्यपालन,प्रजनन,मत्स्यबीज संचयन,खरेदी-विक्री व वाहतुकीस प्रतिबंध..

आता गडचिरोली जिल्ह्यात मांगूर माशाचे मत्स्यपालन,प्रजनन,मत्स्यबीज संचयन,खरेदी-विक्री व वाहतुकीस प्रतिबंध..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील मत्स्यपालक,मच्छिमार,मत्स्य सहकारी संस्था,मत्स्य शेतकरी,मत्स्यबीज विक्रेते,मासे विक्रेते तसेच नागरिकांनी प्रतिबंधित परदेशी मांगूर (वागुर)माशाचे पालन,संवर्धन,प्रजनन,मत्स्यबीज निर्मिती व संचयन तसेच खरेदी,विक्री,वाहतूक अथवा साठवणूक करू नये,असे आवाहन मत्स्यव्यवसायचे सहाय्यक आयुक्त समीर डोंगरे यांनी केले आहे.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार या प्रतिबंधित मत्स्यप्रजातीचे पालन अथवा संवर्धन होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित ठिकाणांची तपासणी करून प्रचलित कायदे व शासनाच्या निर्देशांनुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाशी संबंधित सर्व घटकांनी याबाबत विशेष दक्षता घ्यावी,असे मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे.
  • राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे निर्देश👇
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण प्रधान पीठ,नवी दिल्ली यांनी २२ जानेवारी २०१९ रोजी दिलेल्या आदेशानुसार तसेच त्याच्या संकरित प्रजातींच्या प्रजनन व संवर्धनावर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रतिबंध असल्याचे निर्देश दिले आहेत.त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या प्रतिबंधित मांगूर माशांच्या साठ्याबाबत तपासणी करून तो नष्ट करण्यासंदर्भातही निर्देश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात प्रतिबंधित मांगूर माशाचे पालन,संवर्धन अथवा व्यापार होणार नाही, यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून संबंधितांना सतर्क करण्यात आले आहे.
  • तलाव व जलाशयांमध्ये संचयन टाळावे👇
प्रतिबंधित मांगूर माशाचा जिल्ह्यातील स्थानिक जलस्रोतांमध्ये प्रसार होऊ नये,यासाठी तलाव, जलाशय,शेततळी,मत्स्यपालन केंद्रे तसेच अन्य जलसाठ्यांमध्ये या माशांचे अनधिकृत संचयन अथवा पालन होणार नाही,याची मत्स्यपालकांनी विशेष दक्षता घ्यावी.
मत्स्यपालकांनी मत्स्यबीज खरेदी करतांना संबंधित मत्स्यबीजाची प्रजाती तसेच ते कोणत्या स्रोताकडून उपलब्ध झाले आहे,याची खात्री करावी.अधिकृत व विश्वासार्ह स्रोतांकडूनच मत्स्यबीज खरेदी करावे. कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थेकडून प्रतिबंधित मांगूर माशाचे बीज खरेदी अथवा संचयन करू नये.
  • मासे विक्रेते व व्यावसायिकांनीही घ्यावी दक्षता👇
जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक मासे विक्रेते तसेच मत्स्यव्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांनी प्रतिबंधित मांगूर माशाची खरेदी,विक्री,वाहतूक अथवा साठवणूक करू नये.बाजारपेठेत किंवा अन्य ठिकाणी अशा माशांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाच्या निदर्शनास आणून द्यावी.
  • माहिती मिळाल्यास तपासणी व आवश्यक कार्यवाही👇
जिल्ह्यात कुठेही प्रतिबंधित मांगूर माशाचे पालन किंवा संवर्धन होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यास संबंधित मत्स्यपालन केंद्र,तलाव,शेततळे किंवा अन्य जलस्रोतांची तपासणी करण्यात येईल. तपासणीदरम्यान प्रतिबंधित मांगूर माशाचे पालन,संवर्धन अथवा साठा आढळल्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे निर्देश तसेच प्रचलित कायदे व शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
प्रतिबंधित मांगूर माशाचा विद्यमान साठा आढळून आल्यास त्याची तपासणी करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याबाबत मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश आहेत.त्यामुळे मत्स्यपालक व विक्रेत्यांनी या प्रजातीचे पालन किंवा व्यापार टाळून विभागाला सहकार्य करावे.
  • नागरिकांनी माहिती द्यावी👇
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या परिसरातील तलाव,शेततळी,जलाशय,मत्स्यपालन केंद्र अथवा बाजारपेठेत प्रतिबंधित मांगूर माशाचे पालन, संवर्धन किंवा विक्री होत असल्याचे आढळल्यास त्याबाबतची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, गडचिरोली यांच्या कार्यालयास कळवावी.जिल्ह्यातील मत्स्यपालकांनी स्थानिक व मान्यताप्राप्त भारतीय मत्स्यप्रजातींच्या संवर्धनाला तसेच शाश्वत मत्स्यव्यवसायाला प्राधान्य द्यावे. प्रतिबंधित परदेशी मांगूर माशाचा प्रसार रोखण्यासाठी मत्स्यपालक, मच्छिमार,मत्स्य सहकारी संस्था,विक्रेते आणि नागरिकांनी मत्स्यव्यवसाय विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समीर डोंगरे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बोगस डॉक्टरांसाठी ग्रामपंचायत स्तरावरून मोहीम..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात फोफावलेल्या अनधिकृत व बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी कठोर पावले उचलण्याचे निर्देश...

देसाईगंज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी; शेतीचे नुकसान..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात काल शुक्रवारच्या रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावून शेतकरी बांधवांना एकप्रकारे दिलासा दिला.तर काही ठिकाणी वेगवान वाऱ्याने...

शेतात उभे असतांना जवळच कोसळली वीज; पतीचा मृत्यू,तर पत्नी थोडक्यात बचावली..

उद्रेक न्युज वृत्त  उमरेड(नागपूर):-शेतात मिरचीच्या पिकाची डवरण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा जवळच कोसळलेल्या विजेमुळे मृत्यू झाला,तर पत्नी थोडक्यात बचावली.मात्र, जोडीतील एका बैलाला दुखापत झाल्याची घटना उमरेड...

प्रवासी बस उलटली; सात प्रवासी गंभीर जखमी,तर ३१ प्रवाशांना किरकोळ दुखापत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवनीजवळ आज,शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली.बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून प्रवासी बस रस्त्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!