Thursday, July 9, 2026
Homeगडचिरोलीआता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.....

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषद गडचिरोली व कृषी विभागामार्फत आता जिल्ह्यातील खत वितरण व्यवस्थेवर विशेष ‘देखरेख’ ठेवण्यात येणार असून, खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या २४ तास आधीच त्याची माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांना खतासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.कृषी सचिवांच्या निर्देशानुसार तालुका स्तरावर खतांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे वितरण प्रक्रियेत पारदर्शकता येऊन शेतकऱ्यांचा विश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
नव्या नियमावलीनुसार,खतांच्या रॅक किंवा वाहने जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी किमान एक दिवस आधी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे.तसेच प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.खत साठा पोहोचल्यानंतर सात दिवसांच्या आत त्याची ऑनलाइन ‘पोहोच’ नोंदविणे बंधनकारक राहणार आहे.या संदर्भात,ज्या घाऊक विक्रेत्यांकडे सात दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी ‘पोहोच’ प्रलंबित राहील, त्यांच्यावर तत्काळ विक्रीबंदी लागू करण्यात येणार आहे.तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाईही करण्यात येईल,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान,युरिया व डीएपी खतांच्या साठ्यामध्ये तफावत आढळल्यास गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांकडून थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे.या उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील खतांचा काळाबाजार रोखण्यास मोठी मदत होणार असून खरीप पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
  • किरण खोमणे,कृषी विकास अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली👇
शेतकऱ्यांची आर्थिक लूट आणि खतांची कृत्रिम टंचाई खपवून घेतली जाणार नाही.प्रशासनाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

संशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भंडारा...

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!