Saturday, May 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता कोणत्याही प्रकारच्या रस्ते अपघातात जखमींच्या उपचारासाठी "पीएम राहत" योजना.. - दीड...

आता कोणत्याही प्रकारच्या रस्ते अपघातात जखमींच्या उपचारासाठी “पीएम राहत” योजना.. – दीड लाखापर्यंतचे कॅशलेस उपचार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शासन स्तरावरून रस्ते अपघातातील जखमींसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमओ कार्यालय सेवा तीर्थ येथून रविवार,१५ फेब्रुवारी रोजी रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांच्या उपचारासाठी “पीएम राहत”(PM RAHAT)योजनेला मंजुरी दिलीआहे.पीएम राहत म्हणजेच रोड ॲक्सिडेंट व्हिक्टिम हॉस्पिटलायझेशन अँड ॲश्युअर्ड ट्रीटमेंट.या योजनेंतर्गत कोणत्याही प्रकारच्या रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला १ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळणार आहेत.जखमी व्यक्ती अपघात झाल्यापासून सात दिवसांपर्यंत कॅशलेस उपचारांची सुविधा घेऊ शकेल.जीवघेण्या नसलेल्या प्रकरणांमध्ये २४ तासांपर्यंत दाखल होण्याची आणि गंभीर,जीवघेण्या प्रकरणांमध्ये ४८ तासांपर्यंत दाखल होण्याची सुविधा मिळेल.सदर योजनेत उपचारांची भरपाई रुग्णालयांना मोटर व्हेईकल ॲक्सिडेंट फंडामधून दिली जाईल.या योजनेच्या माध्यमातून गोर-गरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदृष्टीकोण तसेच नागरिकांसाठी असलेली तळमळ लक्षात येते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!