- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने गुरुवार २१ ऑगस्ट रोजी गणेश उत्सवाच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये,याकरीता शासन निर्णय काढून
ऑगस्ट महिन्याचे पगार पुढील महिन्यात न करता पाच दिवस अगोदरच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार हा उद्या,मंगळवार २६ ऑगस्ट रोजी देण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.यात जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे,कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारक,कुटुंब निवृत वेतनधारक यांनाही लागू करण्यात आला आहे.अश्यातच आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील उद्या,मंगळवार २६ ऑगस्टला पगार दिला जाणार असल्याची घोषणा केली आहे.एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत केला जातो. मात्र,गणेशोत्सव दिनाचे औचित्य साधून उद्यालाच एसटी कर्मचाऱ्यांचाही पगार खात्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला जुलै महिन्याच्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीसाठी ४७७.२५ कोटी रुपये देण्यास शासनाने मान्यता दिली असून यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
- Advertisement -

