उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे.या योजनेतंर्गत महिण्याकाठी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये थेट जमा करण्यात येतात.त्यानुसार जुलै ते २४ जानेवारी पर्यंत एकूण ७ हप्ते म्हणजेच १०,५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.अशातच फेब्रुवारी महिन्यातील ८ व्या हप्त्याची रक्कम मार्च महिन्यास प्रारंभ होऊनही लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये जमा न झाल्याने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.अशातच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोमवारी ३ मार्चला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्चला मिळणार असल्याचे स्पष्ट केले होते.तसेच सदरची प्रक्रिया ही तत्पूर्वीच केली जाणार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले होते.त्यानुसार आज,शुक्रवार ७ मार्च पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.बऱ्याच महिलांच्या खात्यात आज शुक्रवारी दीड हजार रुपये जमा झाले असून लाडकी बहीण योजने अंतर्गत फेब्रुवारी महिन्यापर्यंत १२ हजार रुपयांचा लाभ पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.एकाच कुटुंबात दोन लाभार्थी महिला असतील तर अश्यांना २४ हजाराचा लाभ मिळाल्याने महिलांची चांदीच-चांदी तर पुरुषांची वांदीच-वांदी होत असल्याचे काही पुरुषांकडून बोलले जात आहे.
आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात; आतापर्यंत १२ हजारांचा लाभ…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

