Sunday, August 2, 2026
Homeगडचिरोलीआज २५० युवक-युवतींनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ; गडचिरोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी...

आज २५० युवक-युवतींनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ; गडचिरोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत(MY Bharat)यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘व्यसनमुक्त युवा- विकसित भारत संकल्प अभियान’ अंतर्गत आज रविवारी समाज कल्याण कार्यालय गडचिरोली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाला युवक-युवतींसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित युवकांनी पंतप्रधानांचा संदेश ऐकून व्यसनमुक्त भारताच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी सुमारे २५० युवक-युवतींनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प केला.
या प्रसंगी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी युवकांना व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्याचे तसेच समाजात व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन केले.
जिल्हा युवा अधिकारी,माय भारत गडचिरोली सारंग मेश्राम यांनी ‘व्यसनमुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियान’ अंतर्गत पुढील शंभर आठवड्यांमध्ये जिल्ह्यात जनजागृती,क्रीडा,सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून युवकांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन केले.
कार्यक्रमास माय भारत स्वयंसेवक,राष्ट्रीय सेवा योजना (NSS)स्वयंसेवक,युवक मंडळांचे सदस्य,विद्यार्थी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माय भारतच्या गौरी सेलोटे व आकाश मेश्राम यांनी विशेष परिश्रम घेतले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यात अंमलात येणार धर्मांतर-विरोधी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा-२०२६’.. -कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास सात वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात अनेक नागरिकांनी स्वतःचा धर्म बदलून दुसऱ्या धर्माचे स्वीकार केल्याचे,तसेच धर्म बदलल्यानंतरही मूळ धर्मातील लाभ घेण्याचा सपाटा चालवल्याचे...

अखेर ‘त्या’ आत्महत्येचे कारण आले समोर.. – दोन सख्ख्या भावांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील माळेगाव  टाऊन परिसरात गुरुवार ३० जुलै २०२६ रोजी दोन सख्ख्या भावांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास...

पूर ओसरला; प्रशासनाकडून घराघरांत जाऊन पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन दिवसांत  झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा आणि पामुलागौतम नदीला मोठा पूर आला होता.परिस्थिती आता सामान्य असून पूर ओसरल्यानंतर प्रशासनाने...

चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात चीमुकल्यांवर अत्याचार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालानुसार,महाराष्ट्र राज्यात बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!