Friday, July 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण संभ्रमात पडतात.सोने-चांदीचे दर पहिल्यांदा दुपारी १२ वाजताच्या सुमारास तर दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजताच्या जवळपास जारी केले जातात.सदरचे दर हे ‘आयबीजेए’ या व्यवसायिक संघटनेकडून निश्चित केले जातात.आयबीजेए(IBJA-India Bullion and Jewellers Association Ltd.)ही एक व्यवसायिक संघटना असून भारतातील सोन्या-चांदीच्या दरांबाबत माहिती देत सराफा व्यापाऱ्यांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते.त्यातच आज,शुक्रवार ७ नोव्हेंबरला सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरण तर झाली; मात्र,३ टक्के जीएसटीमुळे अद्याप सोने-चांदी लाख मोलाचेच असल्याचे दिसून येत आहे.आज शुक्रवारी
२४ कॅरेट सोन्याचा भाव ४३९ रुपयांनी स्वस्त होऊन १ लाख २० हजार २३१ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला.पण,३ टक्के  जीएसटी पकडले तर सोन्याचा भाव १ लाख २३ हजार ८३७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.तर,चांदीचा भाव जीएसटीसह १ लाख ५२ हजार ४५० रुपये प्रति किलो आहे.आज चांदी जीएसटीशिवाय २३२ रुपयांनी घसरून १ लाख ४८ हजार १० रुपये प्रति किलो दराने नोंदवल्या गेली.विशेष म्हणजे,सध्या स्थितीत सोन्याचा भाव १७ ऑक्टोंबरच्या विक्रमी उच्चांकावरून १० हजार ६४३ रुपयांनी स्वस्त झाला आहे; तर चांदीचा भाव १४ ऑक्टोंबरच्या विक्रमी उच्चांकावरून ३० हजार ९० रुपयांनी उतरले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!