Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीआज गडचिरोली जिल्ह्यात २४ तासासाठी पावसाचा रेड अलर्ट... - अति मुसळधार पाऊस...

आज गडचिरोली जिल्ह्यात २४ तासासाठी पावसाचा रेड अलर्ट… – अति मुसळधार पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राद्वारे गडचिरोली जिल्ह्यात पुढील २४ तासासाठी रेड अलर्ट तर त्यापुढील ४८ तासाकरिता येलो अलर्ट देण्यात आला आहे.जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी केले आहे.
हवामान विभागाने आज,९ सप्टेंबर करिता रेड अलर्ट तर उद्या १० व ११ सप्टेंबर रोजी येलो अलर्टचा इशारा दिला आहे.त्यामुळे नागरिकांनी धातुजन्य वस्तु,विद्युत खांब वा झाडाजवळ राहू नये,झाडाखाली आसरा घेवू नये.मुसळधार अति मुसळधार पाऊसामुळे नदी,नाले, ओढे यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नदीकिनाऱ्यावरील गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी तसेच नदी, नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पुल ओलांडू नये.तलाव,बंधारा,नदी इत्यादी ठिकाणी नागरिकांनी पर्यटनासाठी जाणे टाळावे व धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह करून नये; असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!