Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीआज आणि उद्या गडचिरोलीत संविधानाचा जागर.. - प्रसिध्द गायीका कडुबाई खरात व...

आज आणि उद्या गडचिरोलीत संविधानाचा जागर.. – प्रसिध्द गायीका कडुबाई खरात व प्रसिध्द शाहिरा सीमा पाटील मुंबई यांचे कार्यक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने  भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज,गुरुवार १६ ऑक्टोंबर व उद्या,शुक्रवार १७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सुमानंद सभागृह,आरमोरी रोड गडचिरोली येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली व ती २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली.हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे,कारण या दिवशी जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना स्वीकारण्यात आली,जी भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे.सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय संविधानावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘जागर संविधानाचा’ हा सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे आयोजित एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे, जो भारतीय संविधानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित केला जातो.या कार्यक्रमांमध्ये संगीत,नाट्य यांसारख्या विविध कलांचा समावेश आहे.
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्य राज्याभरात सुरु असलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून गडचिरोली शहरात देखील याचे आयोजन करण्यात आले आहे.यात आज,गुरुवार १६ ऑक्टोंबर रोजी प्रसिध्द गायीका कडुबाई खरात आणि त्यांची चमू संविधानावर आधारित गीतांचे सादरीकरण करतील,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासाचा जागर गीतांमधून सादर करणार आहेत.तर उद्या १७ ऑक्टोंबर रोजी संविधानावर आधारित संगीतमय नाट्याचे सादरीकरण मुंबईचे प्रसिध्द शाहिरा सीमा पाटील आणि त्यांचा संच करणार आहे.या दोन्ही दिवसांचे कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा,असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक,बिभीषण चवरे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!