Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीअसंतुष्ट नेत्यांचा आव; पक्षाच्याच मुळावर घालणार घाव... - आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विदारक...

असंतुष्ट नेत्यांचा आव; पक्षाच्याच मुळावर घालणार घाव… – आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विदारक चित्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-येत्या काही काळात सगळीकडेच विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. विधासभा निवडणुकांसाठी अवघे काही महिने उरलेले असतांनाच आरमोरी विधानसभा क्षेत्रात आमदारकीच्या रिंगणात उभे राहू पाहणाऱ्या नवख्या उमेदवारांची मोठी मजेशीर गंमत पाहायला मिळत आहे.कित्तेक वर्षांपासून दडी मारून बसलेले काही कार्यकर्ते अचानक बिळातून बाहेर पडून,मोठा फौजफाटा घेऊन,सक्रिय झाल्याने जनतेपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.अशातच आरमोरी विधानसभा क्षेत्रात असंतुष्ट नेत्यांचा आव; पक्षाच्याच मुळावर घालणार काय घाव..! अशा चर्चांना आता उधाण येऊ लागले आहे.
काही लोक जेथे सुईने काम होतो; त्या ठिकाणी कुदळ चालवतात.कोणत्याही भूमिपूजन कार्यक्रमासाठी मंत्री हेलिकॉप्टरने येतात आणि शुभ मुहूर्तावर कुदळ मारून निघून जातात.त्यानंतर मात्र मजूर कित्येक महिन्यांपर्यंत खोदकाम करीत असतात.जे लोक कार्यरत असतात ते आपल्या पक्षाच्याच मुळावर कुदळ चालवितात.पक्षातून काढून टाकल्यानंतर ते नवीन पक्षाचे भूमिपूजन करण्याच्या कामामध्ये व्यस्त होऊन जातात.पूर्वी लोक विहीर,तलाव खोदत होते. यामुळे पुण्य पदरात पडते; अशी त्यांची भावना होती. ज्या लोकांना जमीन खोदणे आवडत नव्हते ते पहाडावर निघून जात होते.त्यांच्या बाबतीत असे म्हटले जात होते की, ‘खोदा पहाड, निकला चुहा!’ जेव्हा खोदण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते,तेव्हा लोक पूर्णपणे कुदळ-फावड्यावरच विसंबून होते. अशीच अवस्था हल्ली आरमोरी विधानसभा क्षेत्राची झाली आहे.सध्याचे युग हे स्पर्धेचे आणि तंत्रज्ञानाचे युग आहे.पूर्वीप्रमाणेच कुदळ-फावड्यावरच विसंबून राहिले तर ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे झाल्याशिवाय राहणार नाही.त्रास देणाऱ्यापेक्षा त्रास सहन करणारा सर्वात मोठा श्रेष्ठ समजला जातो. कुणाचे कितीही पाय ओढले तरीही बोलबाला हा बोलबोलाच असतो.जेवढा कमीपणा तेवढाच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धी होत असते; हेही तितकेच खरे आहे.अशातही आता जनता ‘आणे दो’ असे करीत हात धुण्याचे काम करणार असल्याचे आरमोरी विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या गदारोळावरून दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाईनमनला ‘एसीबी’चा जोरदार झटका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका ३६ वर्षीय कंत्राटी लाईनमनला नागपूरच्या एसीबी पथकाने तब्बल ८ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडुन जोरदार झटका दिला आहे.मुकेश...

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!