Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त१६ सप्टेंबर रोजीची ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द; 'या' दिवशी जाहीर करण्यात आली...

१६ सप्टेंबर रोजीची ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द; ‘या’ दिवशी जाहीर करण्यात आली सुट्टी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :- ईद-ए-मिलादची सोमवार दिनांक-१६ सप्टेंबर रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे.ही सुट्टी आता येत्या बुधवार दिनांक-१८ सप्टेंबर या दिवशी जाहीर करण्यात आली आहे.याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.
राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद सणाची सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शवण्यात आली आहे.ईद- ए- मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात.यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.मंगळवार दिनांक-१७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण आहे.यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर,मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार,१८ सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्रामध्ये सोमवारी १६ सप्टेंबर रोजी घोषित केलेली ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द करुन ती आता बुधवार १८ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिवस विचारात घेऊन सोमवारी,१६ सप्टेंबर रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करुन बुधवारी,१८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी; याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा; असे शासनाने अधिसूचनेत म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!