- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
परभणी :-पुण्याहून परभणीकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्समध्ये काळीज हेलावणारी घटना आज,मंगळवार १५ जुलै रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील पाथरी ते सेलू मार्गावरील देवनांदरा शिवारात घडली.धावत्या ट्रॅव्हल्समध्ये महिलेची प्रसूती झाली आणि नवजात अर्भकास ट्रॅव्हल्समधूनच बाहेर फेकण्यात आल्याने ‘त्या’ चिमुकल्याचा दोष काय? माता-पिता एवढे निर्दयी कसे? असा प्रश्न अनेकांच्या मुखी पडलाय. प्रकरणी पाथरी पोलिसांनी परभणीत ट्रॅव्हल्स थांबवून दोघांना ताब्यात घेतले आहे.संबंधित महिला व पुरुष हे एकमेकांचे पती-पत्नी असल्याचे सांगत आहेत.
पुण्याहून ‘संत प्रयाग’ नामक खासगी ट्रॅव्हल
परभणीकडे येत होती.दरम्यान,पाथरी ते सेलू
मार्गावरील देवनांदरा शिवारात ट्रॅव्हल येताच एका प्रवाशाने नवजात बालकास बाहेर फेकत असतांनाच इतर प्रवाशांच्या सदरची बाब लक्षात आली.त्यानुसार
एकाने याबाबत पाथरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून नवजात अर्भक ताब्यात घेत तपास केला असता नवजात अर्भक बालक (पुल्लिंग)असल्याचे निष्पन्न झाले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ ट्रॅव्हल्सचा शोध घेत परभणीमध्ये बस थांबवून प्रवाशांची कसून चौकशी केली आणि एका महिलेसह पुरुषाला ताब्यात घेतले आहे. तपासाअंती संबंधित महिला व पुरुष हे एकमेकांचे पती-पत्नी असल्याचे सांगत आहेत व महिलेची प्रसूती ही ट्रॅव्हल्स मध्येच झाली होती.नवजात अर्भक बाहेर फेकण्याचे नेमके कारण काय? याचा उलगडा पाथरी पोलीस प्रशासन करीत आहे.सदरची कारवाई पोलिस निरीक्षक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक लोखंडे,थोरे,वाघ,कदम सह पथकाने केली.
- Advertisement -

