- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-दुचाकीने पती-पत्नी आठवडी बाजारात मासे विक्रीसाठी जात असतांना वाटेतच सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला,तर पती किरकोळ जखमी झाल्याची घटना काल,शनिवारी ३ मे रोजी दुपारच्या सुमारास आलापल्ली-आष्टी मार्गावरील दीना नदी पुलाजवळ घडली.कमला संजय येलेवार वय ३७ असे मृत पत्नीचे; तर संजय बाला येलेवार वय ४० वर्षे असे जखमी पतीचे नाव आहे. दोघेही अहेरी तालुक्याच्या बोरी जवळील राजपूर पॅच येथील रहिवासी आहेत.
माहितीनुसार,संजय व कमला येलेवार हे पती-पत्नी काल शनिवारी अहेरी येथील आठवडी बाजारात मासे विक्रीसाठी एमएच-३३ एबी-३२०३ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते.दरम्यान,आलापल्ली-आष्टी दरम्यान असलेल्या दीना नदीपुलावर त्यांच्या दुचाकीला सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकने मागून जोरात धडक दिल्याने कमला यांचा जागीच मृत्यू झाला,तर संजय हे किरकोळ जखमी झाले.घटनेची माहिती बोरी व राजपूर पॅच येथील नागरिकांना कळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत घटनेबद्दल रोष व्यक्त केला.काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने अहेरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार सह त्यांच्या पथकाने नागरिकांचा रोष कमी केला.घटनेची सखोल चौकशी करून अज्ञात वाहनधारकावर कठोर कारवाई करू,असे आश्वासन दिल्याने रोष कमी झाला.येलेवार यांचा मासेमारीचा व्यवसाय असून या व्यवसायावरच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.त्यांना कल्याणी,मोनिका,रेखा व श्रुती अशा चार मुली असून,अपघातात आईचा मृत्यू झाल्याचे कळताच मुलींनी एकच हंबरडा फोडला.नकळत अचानकपणे झालेल्या आईच्या अपघाताने चारही मुली आईच्या प्रेमाला पोरक्या झाल्या आहेत.आईविना जग हे अधुरेच..! घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी पोलिस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

