Thursday, September 24, 2026
Homeगडचिरोलीअन् ग्रामपंचायत पदाधिकारीच बनले ठेकेदार…-पैसे वाचविण्यासाठी निकृष्ट दर्जाची बांधकामे…

अन् ग्रामपंचायत पदाधिकारीच बनले ठेकेदार…-पैसे वाचविण्यासाठी निकृष्ट दर्जाची बांधकामे…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील अनेक गावे समस्याग्रस्त आहेत.परंतु ग्रामपंचायतींचे पदाधिकारी गावातील समस्यांकडे लक्ष देत नसून केवळ ठेकेदारीत व्यस्त असल्याचे विदारक चित्र हल्ली सगळीकडेच दिसून येत आहे.अशातच जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये अशीच परिस्थिती असल्याने तालुक्यातील अनेक गावांत शिक्षण,घर, स्वच्छता,पिण्याचे पाणी,रस्ते,नाल्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.

गावचा सर्वांगीण विकास व्हावा; तसेच गावातील समस्या सोडविण्यात याव्या; हे केवळ प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या भरवशावर होऊ शकणार नसल्याने लोकशाही मार्गाने दर पाच वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक घेऊन गावातील पदाधिकारी यांची ग्रामपंचायत स्तरावर निवड करण्यात येते. पदाधिकारी निवडून आल्यावर काही पदाधिकारी सोडल्यास इतर हुशार पदाधिकारी केवळ ठेकेदारी वा खिसे कसे गरम होणार; याकडे सर्वात जास्त लक्ष देण्यात मग्न असतात.

ग्रामपंचायतींचे पदाधिकारी ठेकेदारीत रमले असल्याने बांधकामांवर देखरेखीचा अभाव दिसून येत आहे. त्यातच नियोजनानुसार कामे केली जात नसून पैसे वाचविण्यासाठी निकृष्ट दर्जाची बांधकामे करण्यात येत आहेत.ग्रामपंचायतीचे पदाधिकारीच कंत्राटदार असल्यामुळे ‘हम करे सो कायदा’ अशी गत झाली आहे.बहुतांश गावांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांचे कंत्राट ग्रामपंचायत पदाधिकारी स्वतःच घेऊन; दुसऱ्यांची नावे पुढे करून; ‘तो मी नव्हेच’अशी भूमिका बजावतांना दिसून येत आहेत.त्यामुळे अशांवर आळा घालणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!