Friday, May 22, 2026
Homeगडचिरोलीअनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरूणांसाठी 'स्टँड अप इंडिया' मार्जिन मनी योजना - समाजकल्याण...

अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरूणांसाठी ‘स्टँड अप इंडिया’ मार्जिन मनी योजना – समाजकल्याण गडचिरोली कार्यालयाशी संपर्क साधावा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरूणांना मार्जीन मनी उपलब्ध करून देणेबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील  सवलतीस पात्र १८ वर्षावरील नवउद्योजक तरूणांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास ‘स्टॅंड अप इंडिया’ योजनेअंतर्गत ७५% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या १५% हिस्सा (अनुदान) राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक मासाका-२०१८/प्र.क्र. २५९/ (२)/अजाक, दिनांक ८ मार्च,२०१९ व शा. नि. क्रमांक स्टँडई-२०२०/प्र.क्र.23/अजाक, दि.०९ डिसेंबर २०२० अन्वये शासन स्तरावरुन निश्चीत करण्यात आल्या आहेत. सदरचा शासन निर्णय शासनाच्या WWW.Maharashtra gov. in संकेतस्तळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

गडचिरोली जिल्हयातील पात्र इच्छूक नवउद्योजक तरूणांनी कार्यालय, सहायक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,एल.आय.सी ऑफीस रोड,गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!