Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीअधिकृत उमेदवारामागे उभे राहण्याऐवजी बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही... -विनंतीही करूनही न...

अधिकृत उमेदवारामागे उभे राहण्याऐवजी बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही… -विनंतीही करूनही न ऐकल्यास हकालपट्टीही करू.. – विजय वडेट्टीवार यांनी पत्र परिषदेत बंडखोरांना दिला इशारा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यातील विधानसभा निवडणूक मतदान येत्या २० नोव्हेंबरला पार पडणार आहे. तत्पूर्वी २२ ऑक्टोंबर ते २९ ऑक्टोंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली.राज्यात महाविकास आघाडी,महायुती तसेच इतर मित्र पक्ष मिळून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.अशातच निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्यांच्या विरोधात काहींनी बंड पुकारून सुरुवातीला तसेच अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केल्याने अधिकृत पक्षांची मोठी गोची निर्माण झाली आहे.असाच प्रकार गडचिरोलीतील विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे.त्यात जिल्ह्याच्या तीनही विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसमधील नाराजांनी बंडखोरी केली.त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची कोंडी झाली आहे.या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समजावू,विनंती करू,ऐकलेच नाही,तर बाहेरचा रस्ता दाखवू,अशा शब्दांत बंडखोर उमेदवारांना इशारा दिला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी काल, ३० ऑक्टोंबर रोजी  पत्रकार परिषद घेतली.ते म्हणाले उमेदवारांची निवड ही योग्यतेनुसार केलेली आहे.त्यामुळे अधिकृत उमेदवारामागे उभे राहण्याऐवजी कोणी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरले असतील तर त्यांना समजावून सांगू,प्रसंगी विनंतीही करू,पण न ऐकल्यास हकालपट्टीही करू,असा दम त्यांनी भरला.यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही टीका केली.
यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान,मनोहर पोरेटी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,माजी जि.प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार,ॲड.राम मेश्राम,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ॲड.कविता मोहरकर,माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!