- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून प्रतीक्षा संपली आहे.येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत.पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण सहा हजर रुपये दिले जातात.ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.विशेष म्हणजे,योजनेचा २३वा हप्ता २० जून २०२६ रोजी वितरित करण्यात आला होता.अश्यातच आता २४ वा हप्ता हा दिवाळीपूर्वीच जमा करण्यात येणार असल्याने शेतकरी बांधवांना सणाच्या निमित्ताने मोठा आधार मिळू शकतो.अश्यातच सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.या योजनेसाठी अधिकृतरित्या संबंधित पोर्टलवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही,अश्यांनी तात्काळ प्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे.

- Advertisement -

