Tuesday, May 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर रेशन दुकानदारांनी पुकारलेला बंद तुर्तास स्थगित... - गोरगरीब जनतेची दिवाळी होणार...

अखेर रेशन दुकानदारांनी पुकारलेला बंद तुर्तास स्थगित… – गोरगरीब जनतेची दिवाळी होणार सुखमय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानदारांनी १ नोव्हेंबरपासून पुकारलेला बंद तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देवल यांनी नवीन सरकार आल्यावर तुमचे प्रश्न मांडा असे आवाहन केल्याने संघटनेने एक पाऊल मागे घेतले. त्यामुळे गोरगरीब जनतेची दिवाळी सुखमय होणार आहे.
केंद्र सरकारने क्विंटलमागे २० रुपये मार्जिन वाढवून द्यावे; या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांवरुन राज्यातील रेशन दुकानदारांनी आक्रमक भूमिका घेतली.आल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनच्या नेतृत्वात लक्ष्मीपूजनापासून संपावर जाण्याची घोषणा केली होती.रेशन दुकानदारांनी पुकारलेल्या संपाची प्रधान सचिव देवल यांनी तातडीने दखल घेत चर्चेसाठी पाचारण केले.निवडणूकांची आचारसंहिता लागू असल्याने संपावर जाता येणार नाही.तसेच नवीन सरकार स्थापन झाल्यावर तुमचे कमिशन वाढवून घ्यावे.तसेच अन्य मागण्यांबाबतही प्रयत्न करु असे आवाहन देवल यांनी केले. संघटनेने देवल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संप तुर्तास स्थगित केला आहे. बैठकीसाठी संघटनेचे राज्यध्यक्ष गणपत डोळसे-पाटील, डी.एन.पाटील,निवृत्ती कापसे, शांताराम पाटील,विवेक भेरे,बाबुराव ममाने आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांना आता कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता.. – इंधन दरवाढीचा परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना मोठा झटका देण्यास सुरुवात केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात...

आता वाघही पडणार गोंधळात; हल्ला करायचा की नाही?..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-हल्ली सर्वत्र वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघ केव्हाही हल्ला करून जिविनिशी ठार करू शकतो.यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात वाघांचे हल्ले...

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!