Sunday, September 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख झाली जाहीर.. -राज्यात आचारसंहिता लागू..

अखेर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख झाली जाहीर.. -राज्यात आचारसंहिता लागू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका केव्हा जाहीर होणार,याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या होत्या.अशातच आता आज,मंगळवारी १५ ऑक्टोंबरला मुख्य निवडणूक आयुक्त यांनी दिल्लीत पत्र परिषद घेत माहिती दिली.महाराष्ट्र राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून यासाठी तारीख जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.यामुळे आता राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.त्यामुळे राज्य सरकारला कोणतेही निर्णय आचारसंहितेच्या काळात घेता येणार नाहीत.
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणुकीचे बिगूल वाजले आहे.
राज्यातील सध्याच्या राजकीय समीकरणाबाबत बोलायचे झाले तर,यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत पक्षफुटीमुळे दोन गट निर्माण झाले आहे.याचा या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे.दरम्यान या सगळ्यात आता दोन्ही युतींमध्ये जागावाटपावरून वाद आणि मतभेद होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी गावपातळीवर प्रसिद्ध.. – गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’च्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील ३ हजार ६१० शेतकरी पात्र ठरले आहेत.पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!