- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आदिवासी,अतिदुर्गम भागातील कोरची तालुक्यात ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्र-छत्तीसगड सिमेलगत असलेल्या बोगाटोला गावशेजारील जंगल परीसरात एक तरुण अर्धवट जमिनीत गाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.त्यानुसार,कोरची पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर शवविच्छेदन अहवालात तरुणास धारदार शस्त्राने मानेवर व चेहऱ्यावर वार करून जिवानीशी ठार मारले व गुन्हा उघड होऊ नये म्हणुन जमिनीत पुरण्याचा प्रयत्न केला असल्याचे निष्पन्न झाल्याने कोरची पोलीस ठाण्यात सोमवार २ फेब्रुवारी २०२६ रोजी अपराध क्रमांक- १९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम१०३(१),२३८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आल्याने सदरची घटना सर्वत्र उघडकीस आली होती.अश्यातच आता प्रकरणातील मारेकऱ्यांना अटक करण्यात कोरची पोलिसांना यश आले आहे.प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकर व पत्नीने मिळून सहकाऱ्यांची मदत घेत खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून प्रकरणी आज,बुधवार ४ फेब्रुवारी रोजी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.जितु कंवर वय ३० वर्षे,रा.जठकन्हार ता.डोंगरगड, जि.राजनांदगाव असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून आरोपींमध्ये पत्नी सोनाली जितु कंवर वय २५ वर्षे, रा.डोंगरगड(छत्तीसगड),प्रियकर शानु पठाण रा.जांभुळखेडा,ता.कुरखेडा व शानुचे मित्र पुंकेश बोरकर,चंद्रशेखर गुज्जेवार व धनपाल मडावी सर्व रा.जांभुळखेडा ता.कुरखेडा, जि.गडचिरोली असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.अटकेतील पाचही आरोपींना आज बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटनेच्या दिवशी जितु कंवर याचा संपूर्ण चेहरा कुजलेला असल्याने ओळख पटवणे आणि गुन्ह्याचा छडा लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.मात्र,घटनास्थळावर एक प्लास्टीकची चुंगळी आणि मृतदेहास जमिनीत गाळण्यासाठी कुठले तरी हत्यार वापरण्यात आले असावे,असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता आणि त्या दिशेने तपास यंत्रणा कामी लागली होती.अश्यातच २० जानेवारी २०२६ रोजी कुरखेडा तालुक्याच्या जांभुळखेडा येथील चार इसम हे सदर परीसरात कोणाचे तरी घरून साहित्य घेऊन गेल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार,पोलिसांनी चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेतले असता प्रकरणाचा उलगडा झाला. शानु पठाण याचे २५ वर्षीय सोनाली सोबत प्रेमसंबंध होते.ती विवाहित आहे.सुरू असलेल्या प्रेमसंबंधाची चुनूक सोनालीचा पती जितु कंवर याला लागल्याने तो दोघांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरू लागला होता. त्यामुळे,सोनालीने तीचा पती जितु कंवर याला कोरची तालुक्याच्या खुर्शिपार येथे बोलावले व परत डोंगरगडकडे सासरी जात असंतांना त्याची माहीती सोनाली हीने तीचा प्रीयकर शानु पठाण याला दिली. त्यानुसार,शानु पठाण याने जांभुळखेडा गावातील मित्र पुंकेश बोरकर,चंद्रशेखर गुज्जेवार व धनपाल मडावी यांना सोबत घेऊन बोगाटोला जंगलाजवळ गाडी बहाण्याने थांबवुन धारदार हत्याराने खुन केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने सर्व ५ आरोपींना आज बुधवारी अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.
- Advertisement -

