Wednesday, May 20, 2026
Homeगडचिरोलीअखेर आरमोरीच्या वनखी येथील नळ पाणीपुरवठा योजना सुरू..

अखेर आरमोरीच्या वनखी येथील नळ पाणीपुरवठा योजना सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत चामोर्शी माल अंतर्गत मौजा वनखी (वासाळा)येथील नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली असून,गावातील नागरिकांना पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. योजनेतील उर्वरित किरकोळ कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.
वनखी येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे.या योजनेमध्ये पुरवठा विहीर,स्वच्छता कामे,उर्ध्वनलिका,जलकुंभ,वितरण व्यवस्था व इतर पूरक कामांचा समावेश आहे.योजनेचे बहुतांश कामे पूर्ण झाले असून १६ मे २०२५ पासून चाचणी तत्वावर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र,९ जानेवारी २०२६ रोजी व्हॉल्व्ह लिकेज झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला होता.त्यानंतर संबंधित व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात आली.दरम्यान,वीज देयक थकबाकीमुळे योजनेचा मीटर बंद करण्यात आल्याने पाणीपुरवठा सुरू करण्यात अडचण निर्माण झाली होती. या संदर्भात ग्रामपंचायत,कंत्राटदार,विद्युत विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये वेळोवेळी चर्चा करण्यात आली.२८ एप्रिल २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात कंत्राटदाराची सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी वीज देयकाची थकबाकी तात्काळ भरून योजना सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार,५ मे २०२६ रोजी विद्युत विभागामार्फत देयकाची तृटीपूर्तता करून वीज देयक भरण्यात आले. योजनेचा मीटर थ्री फेजचा असतांनाही सुरुवातीला सिंगल फेज पुरवठा सुरू करण्यात आला होता.त्यानंतर ६ मे २०२६ रोजी पुन्हा लाईनमनमार्फत थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्यात आला.पुढे ७ मे २०२६ रोजी पाण्याची टाकी स्वच्छ करून गावात नळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.वनखी येथील नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी योजनेतील उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोरचीत ‘सगुणा भात शेती तंत्रज्ञान’ प्रात्यक्षिक.. -पाण्याची बचत,मजुरीत कपात आणि उत्पादनवाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तालुका कृषी विभाग कोरची यांच्या वतीने मौजे शिकारीटोला येथे ‘सगुणा भात लागवड तंत्रज्ञान’ (SRT)या आधुनिक आणि नाविन्यपूर्ण शेती पद्धतीचे प्रत्यक्ष शेतावर...

बापरे..! फेरफार नोंदीसाठी तलाठ्याने मागितले १ लाख २५ हजार.. – तलाठी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार नोंदीमध्ये नाव नोंदवण्यासाठी चक्क १ लाख २५ हजाराची लाच मागून १ लाख रुपये स्विकारले व उर्वरित...

अखेर किडनी विक्री प्रकरणातील शेतकऱ्यास ५ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश वितरीत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील रोशन शिवदास कुळे वय ३५ वर्षे या शेतकऱ्याची व्यथा ऐकून दगडलाही पाझर फुटेल अशी घटना मंगळवार १६ डिसेंबर २०२५ रोजी उघडकीस...

अनियंत्रित ट्रक पलटी; तिघांचा मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर आणि काटोल मार्गावरील मोवाड गावाकडे विटा भरून जाणाऱ्या एका आयशर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित ट्रक पलटी होऊन तीन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!