Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीचर्मकार समाजातील बांधवांनी ५० टक्के अनुदान व बीजभांडवल योजनेसाठी कर्ज प्रस्ताव सादर...

चर्मकार समाजातील बांधवांनी ५० टक्के अनुदान व बीजभांडवल योजनेसाठी कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित यांच्या मार्फत चर्मकार समाजातील (चांभार,ढोर,मोची व होलार)महिला व पुरुषांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी विविध स्वयंरोजगार योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.या अंतर्गत ५० टक्के अनुदान योजना तसेच बीजभांडवल योजनांसाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले असून पात्र लाभार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या ५० टक्के अनुदान योजनेअंतर्गत ९ लाभार्थी तर बीजभांडवल योजनेंतर्गत ७ लाभार्थी अशा एकूण १६ लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.या योजनांच्या माध्यमातून समाजातील युवक व महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील असणे आवश्यक असून त्याचे वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असावे.अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.तसेच लाभार्थ्याने स्वतः व्यवसाय करणे बंधनकारक राहणार आहे.
अर्जासोबत जात प्रमाणपत्र,चालू वर्षाचा उत्पन्न दाखला,रेशन कार्ड,रहिवासी दाखला,आधार कार्ड, मतदान ओळखपत्र,शैक्षणिक प्रमाणपत्र,पासपोर्ट आकाराचा फोटो,उद्योग आधार,सिबिल स्कोअर, व्यवसायाच्या जागेचा पुरावा,बँक पासबुकची झेरॉक्स आदी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या तीन प्रती जिल्हा कार्यालय गडचिरोली आयटीआयच्या पाठीमागे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,तळ मजला,चंद्रपूर रोड,गडचिरोली येथे सादर करावे.अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच जास्तीत जास्त समाज बांधवांनी या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.टी.जिभकाटे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!