Saturday, August 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात.. - तीन हजार...

अखेर आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात.. – तीन हजार की दीड हजार?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नियमित योजनेचा लाभ देण्यास परवानगी दिल्यानंतर आज,मंगळवार १३ जानेवारीपासून राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या  पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असतांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे.त्यानुसार,केवळ डिसेंबर महिन्याचेच दीड हजार रुपये  बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत.”लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट देण्यासाठी १४ जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे तीन हजार जमा होणार,” अश्या आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यासंदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहिण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे,असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळविले होते.
विशेष म्हणजे,राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचार संहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत.या आदेशातील तरतुदींनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकासकामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे,असे मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळविले होते.ही पार्श्वभूमी लक्षात घेता,या योजनेचा नियमित लाभ देता येईल; परंतु अग्रिम स्वरुपात लाभ देता येणार नाही; तसेच नवीन लाभार्थी देखील निवडता यणार नाहीत,असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले.त्यामुळे, लाडक्या बहिणींना तीन हजार ऐवजी दीड हजार रुपये देण्यास परवानगी मिळताच, महानगर पालिकांच्या मतदानाच्या दोन दिवस अगोदर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आजपासून दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या...

कर्जमाफी योजनेतील ३ हजार ८१२ शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाने २ जून आणि १५ जुलै २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे.या योजनेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!