Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीमार्कंडादेव येथील जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थानच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त अन्नदान..

मार्कंडादेव येथील जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थानच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त अन्नदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चामोर्शी(गडचिरोली):-चामोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थान अंतर्गत शारदीय नवरात्र निमित्ताने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असुन संपुर्ण नवरात्र उत्सवा दरम्यान अंखड ज्योत प्रज्वलित ठेवण्यात आली होती.शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विधीवत होम-हवन पुजा अर्चना डॉ.रविंद्र सुरपाम यांचे सह भार्या जयश्री सुरपाम यांच्या हस्ते संपन्न झाले.पुजेचे सर्व संस्कार मठाधिपती आचार्यं श्री श्रीमंत संतोष सुरपाम यांनी केले तर सायंकाळच्या सुमारास नऊ कन्या यांचे पुजन करुन नगर भोजनासह महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला शक्तीपिठ संस्थानच्या सचिव अल्का शेडमाके,छबिलदास सुरपाम,पाध्यक्ष रत्नादेवी गेडाम,कोष्याध्यक्ष वर्षा भाजीपाले,सदस्य मंजुळा वेलादी,माजी संरपच ललिता मरसकोल्हे,ग्रामपंचायत सदस्य वर्षा सरपे,मारोती जुनघरे,वामन शेन्डे,देवानंद सुरपाम,भगवान शेंडे,माजी सरपंच मुकरु शेंडे,मुकरु राऊत आदी मान्यवर सह भक्तिमय वातावरणात भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थीत होते.अशी माहीती संस्थानच्या कोष्याध्यक्ष वर्षा भाजीपाले यांनी दिली असुन संस्थान तर्फे विविध लोकोपयोगी कार्यक्रमही नऊ दिवस घेण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगितले .
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!