Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील चाळीसाव्या सत्रात विलास जेंगठे सह प्रभाकर दुर्गे विजयी...

नाट्यश्री कविता स्पर्धेतील चाळीसाव्या सत्रात विलास जेंगठे सह प्रभाकर दुर्गे विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे चाळीसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३६ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून स्पर्धेचे चाळीसावे सत्र असल्याने यावेळी दोन कवींना सन्मानित करण्यात आले आहे.त्यात गडचिरोली जिल्ह्यातीलच खेडेगावातील दोन कवींनी बाजी मारली आहे.गडचिरोली तालुक्यातील नवोदित कवी  विलास जेंगठे व मुलचेरा तालुक्यातील प्रसिद्ध कवी प्रभाकर दुर्गे या  दोन कवींची आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून निवड करण्यात आली असून,त्यांच्या अनुक्रमे “जात” व “आर्त किंकाळी वीर मातेची” या कवितांची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
विलास जेंगठे हे दिभना (ता.जि.गडचिरोली) येथील नवोदित कवी असून ते शेतकरी आहेत.शेती करुन व भाजीपाला विकून ते आपला उदर्निर्वाह करतात. त्यांनी नुकतीच कविता लेखनास सुरुवात केलेली आहे.तर प्रभाकर दुर्गे हे मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक या अती दुर्गम भागात राहतात.ते परिवर्तनवादी कविता व चळवळीच्या कविता लिहीतात.अनेक कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे. विविध पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.या दोन खेडेगावातील नवोदित साहित्यिकांना नाट्यश्रीच्या स्पर्धेत एकाच वेळी पुरस्कृत करण्यात येत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.
या चाळीसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा. पी.एस.बनसोडे,माधुरी अमृतकर,अजय राऊत,गणेश रामदास निकम,रेखा दिक्षित,वामनदादा गेडाम,संगीता ठलाल,लता शेंद्रे,संतोष कपाले,राजेंद्र यादवराव सोनटक्के,चरणदास वैरागडे,संगीता रामटेके,रोहिणी पराडकर,मुरलीधर खोटेले,कु.भावना रामटेके, भिमानंद मेश्राम,पुनाजी कोटरंगे,वामनदादा गेडाम,  सुनिल चडगुलवार,ऊकंडराव नारायण राऊत,प्रभाकर दुर्गे,तुळशीराम उंदीरवाडे,प्रिती ईश्वर चहांदे,सोनाली रायपुरे-सहारे,मधुकर दुफारे,यामिनी मडावी,वंदना सोरते,प्रियंका ठाकरे,गजानन गेडाम,किशोर बोरकुटे, राजरत्न पेटकर,खुशाल म्हशाखेत्री,विलास जेंगठे, ज्योत्स्ना बन्सोड,शैला चिमड्यालवार,सुजाता अवचट इत्यादी कविंनी सहभाग नोंदविला होता.
चाळीसाव्या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!