Wednesday, October 28, 2026
Homeगडचिरोलीपेसा क्षेत्रातील पदभरतीची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध -उमेदवारांनी दस्तावेज पडताळणीसाठी...

पेसा क्षेत्रातील पदभरतीची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध -उमेदवारांनी दस्तावेज पडताळणीसाठी वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे- आयुषी सिंह

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेच्या पदांबाबत जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहचल्या होत्या.काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहिर केला होता,तर काही विभागांमार्फत निवडप्रक्रियेचा निकाल तयार झाला होता,परंतू जाहिर झाला नव्हता. पेसा क्षेत्रातील पदे १ वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी जिल्हा परिषदे अंतर्गत अनुसुचित क्षेत्रातील (पेसा) अधिसुचित संवर्गातील पदांकरिता निवड प्रक्रियेव्दारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधुन विशेष बाब म्हणून मानधन तत्त्वावर नियुक्त करण्यास संवर्गनिहाय संबंधित प्रशासकिय विभागांना शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आलेली आहे.
पदभरती संदर्भाने सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ५ ऑक्टोंबर २०२४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे कार्यवाही करुन अनुपालन अहवाल ८ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत शासनास सादर करायचे आहे.त्याकरीता आरोग्य सेवक (पुरुष),आरोग्य सेवक (महिला),कंत्राटी ग्रामसेवक,पशुधन पर्यवेक्षक व अंगणवाडी
पर्यवेक्षिका यांची गुणवत्तेनुसार दस्ताऐवज पडताळणी तातडीने करण्यात येत असल्याने गुणवत्ता यादी व दस्ताऐवज पडताळणीचे वेळापत्रक जिल्हा परिषद, गडचिरोलीचे संकेतस्थळ www.zpgadchiroli.in येथे प्रसिध्द करण्यात येणार आहे.तेव्हा उमेदवारांना याव्दारे आवाहन करण्यात येते की,विभागांनी प्रसिध्द केलेल्या गुणवत्ता यादीचे व वेळापत्रकाचे जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या संकेतस्थळावर भेट देऊन पाहणी करावी व त्यानुसार दस्ताऐवज पडताळणी करीता सहकार्य करुन आवश्यक दस्ताऐवजासह पडताळणीस हजर रहावे.अनुपस्थित राहील्यास आपणास पुनश्च संधी देता येणार नाही; असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आयुषी सिंह यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्हा परिषद अनुकंपा नियुक्तीसाठी समुपदेशन; प्रतीक्षासूचीतील १९२ उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदांवर अनुकंपा नियुक्तीसाठी येत्या,सोमवार २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समुपदेशन...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!